मुलीचा अश्लील फोटो व्हायरल, मागितली एक लाखाची खंडणी
Ahmednagar Crime: मुलीचा अश्लील फोटो व्हायरल करून तो व्हॉटस अॅपच्या डीपीवरून हटविण्यासाठी एक लाखाची खंडणी (Ransom) मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.
अहमदनगर: मुलीचा अश्लील फोटो व्हायरल करून तो व्हॉटस अॅपच्या डीपीवरून हटविण्यासाठी एक लाखाची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना सोमवारी (दि. १३) नगरमध्ये घडली. मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून सायबर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या मुलीचा मोबाईल एकाने हॅक केला. त्यानंतर त्याने मुलीचा अश्लील फोटो त्याच्या मोबाईलच्या डीपीवर अपलोड केला. आपला फोटो सोशल मीडियावर आहे. व्हायरल केल्याची माहिती मुलीने वडिलांना सांगितली. वडिलांनी संबंधित मोबाईल नंबरवर संपर्क केला.
मुलीचा फोटो डीपीवरून हटविण्याची विनंती वडिलांना केली. त्यावर एक लाख रुपये द्या, नाही तर तुमच्या मुलीचा फोटो आणखी इतर ठिकाणी व्हायरल करीन, अशी धमकी दिली, असे फिर्यादीत म्हटले पुढील तपास सायबर पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.
Web Title: Girl’s obscene photo viral, one lakh ransom demanded
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App