Home अहमदनगर अहमदनगर: आग आटोक्यात आणणाऱ्या साधनांच्या गोडाऊनला आग, दोघांचा होरपळून मृत्यू, दोघे जखमी

अहमदनगर: आग आटोक्यात आणणाऱ्या साधनांच्या गोडाऊनला आग, दोघांचा होरपळून मृत्यू, दोघे जखमी

Ahmednagar News: जामखेड येथील घटना, आग (Fire) आटोक्यात आणणारी साधने बनविणाऱ्या गोडाऊनला शॉर्टसर्किटमुळे आग, दोन कामगारांचा होरपळून मृत्यू झाला तर दोघे जखमी.

Godown of fire fighting equipment caught fire, two died

जामखेड : जामखेड शहरातील नगर रस्त्यावरील आग आटोक्यात आणणारी साधने बनविणाऱ्या गोडाऊनला शॉर्टसर्किटमुळे आग लागली. यामध्ये दोन कामगारांचा होरपळून मृत्यू झाला तर दोघे जखमी झाले. ही घटना शनिवारी (दि.१३) दुपारी दीडच्या सुमारास घडली.

घटनेची माहिती माजी सरपंच सुनील कोठारी व संदेश कोठारी यांनी सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांना दिली. ते तातडीने जखमींना आणण्यासाठी आपली रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळी पोहोचले.

त्याचबरोबर अग्निशामक दलाचे जवान अय्याज शेख, विजय पवार, अहमद सय्यद, पोलिस निरीक्षक महेश पाटील, सहायक पोलिस निरीक्षक सुनील बडे, अनिल भारती, त्यांचे सहकारी, शंकर बोराटे, दीपक भोरे, तन्वीर मुलानी, निखिल कुमकर, गोकुळ जाधव, सनी सदाफुले, बापू गायकवाड, विशाल ढवळे, सुनील मोरे, सागर पोकळे, रितेश पोकळे, साधू पोकळेंसह आदींनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले.

ज्ञानेश्वर चंद्रकांत भोंडवे (वय ४५, रा. घोडेगाव, ता. जामखेड), जहीर सत्तार मुलानी (वय ३५, रा. तेरखेड, ता. वाशी, जि. धाराशिव) अशी मृतांची नावे आहेत. जामखेड-नगर रस्त्यावर पंकज रवींद्र शेळके यांच्या फायरबॉल गोडाऊनमध्ये शनिवारी दुपारी दीडच्या सुमारास कामगार ज्ञानेश्वर चंद्रकात भोंडवे व जहीर सत्तार मुलानी हे दोन कामगार काम करत होते. इतर दोघे गोडाऊनच्या बाजूला थांबलेले होते. त्यावेळी अचानक शॉर्टसर्किटमुळे आग लागली. गोडाऊनमध्ये चारशेच्या आसपास फायरबॉल होते. त्यानंतर नागरिकांनी जेसीबीच्या साहाय्याने या गोडाऊनला पाठीमागून भगदाड़ पाडले. त्यावेळी गोडाऊनमधून धुराचे मोठमोठे लोळ बाहेर येत होते. आतमध्ये तमध्ये असलेल्या फायरबॉलचे आगीमुळे स्फोट होत होते. नगरपरिषदेच्या अग्निशामक दलाच्या जवानांनी नागरिकांच्या मदतीने तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. या आगीत ज्ञानेश्वर चंद्रकात भोंडवे जहीर सत्ता मुलानी अशा दोघांचा होरपळून मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. गोडाऊनच्या बाजूला असलेले गणेश पवार, पूजा पठाडे असे दोन जण जखमी झाले. जखमी महिला पूजा पठाडे हिला जामखेड येथील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.

Web Title: Godown of fire fighting equipment caught fire, two died

Sangamner Akole News Whats app Marketing

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here