Home अकोले Akole: अकोले तालुक्यात मंदिरातून देवांचे मुखवटे चोरी

Akole: अकोले तालुक्यात मंदिरातून देवांचे मुखवटे चोरी

gods stolen from temples in Akole taluka

भंडारदरा | Akole: अकोले तालुक्यातील पेंडशेत गावातील हनुमान मंदिरातून अज्ञात चोरट्यांनी देवाचे मुखवटे लंपास केल्याची घटना घडली आहे. शुक्रवारी पहाटे ५.१५ वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

या मुखवट्याची किंमत सुमारे ४७ हजार रुपये अशी आहे. कळसुबाई शिखराच्या पायथ्याशी असलेल्या पेंडशेत गावातील हनुमान मंदिर आहे.

या मंदिरात गावातील पुजारी काळू तुकाराम ओळे हे मागील चार वर्षापासून देवाची पूजा करतात. पूजा आटोपल्यावर देव पुन्हा गाभाऱ्यात ठेवले जातात.

शुक्रवारी सकाळी पाच वाजता देवाची पूजा करण्यासाठी ओळे हे गेले असता देवाचे मुखवटे दिसून आले नाहीत. त्यांनी शोधाशोध केली मात्र देवाचे मुखवटे कोठेही आढळले नाही. देवाचे मुखवटे चोरीला गेल्याचे लक्षात आल्याने याप्रकरणी राजूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

Web Title: gods stolen from temples in Akole taluka

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here