Home Accident News भरधाव वाहनाच्या धडकेत आदर्श ग्रामसेवक पुरस्कर्ते ग्रामसेवकाचा मृत्यू, कडकडीत बंद

भरधाव वाहनाच्या धडकेत आदर्श ग्रामसेवक पुरस्कर्ते ग्रामसेवकाचा मृत्यू, कडकडीत बंद

Ahmednagar, Pathardi Accident:  अज्ञात वाहनाच्या धडकेत झालेल्या अपघातात ग्रामसेवकाचा मृत्यू.

gram sevak died in a collision with a speeding vehicle Accident

पाथर्डी:  पाथर्डी तालुक्यातील करंजी गावात सोमवारी (दि.31) रात्री भरधाव अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत गंभीर जखमी झालेले आदर्श ग्रामसेवक पुरस्कार प्राप्त अनिल शिवाजी भाकरे (37) यांचा बुधवारी उपचारा दरम्यान मृत्यू (Died) झाल्याची घटना घडली. गुरुवारी करंजीत सर्व ग्रामस्थांनी कडकडीत बंद पाळून या घटनेबद्दल शोक व्यक्त केला.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ग्रामसेवक भाकरे सोमवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास करंजी बस स्टॅन्डकडून घराकडे येत असताना त्यांच्या मोटरसायकलला अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्याने अपघात झाला. त्यानंतर तात्काळ त्यांना नगर येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्याठिकाणी प्रकृती आणखी खालावल्याने भाकरे यांना मंगळवारी पुणे येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

बुधवारी सकाळी उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. त्यांच्या अंत्यविधीसाठी जिल्हा परिषदेचे ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश शिंदे, नगर तालुक्याचे गटविकास अधिकारी श्रीकांत खरात, ग्रामसेवक संघटनेचे राज्य अध्यक्ष एकनाथराव ढाकणे, नगर तालुका विस्तार अधिकारी चंद्रकांत खाडे, तुपे, अहमदनगर जिल्हा ग्रामसेवक पतसंस्थेचे चेअरमन विजयकुमार बनाते तसेच नगर जिल्ह्यातील सर्व ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक, ग्रामस्थ, तरुण वर्ग उपस्थित होते. या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: gram sevak died in a collision with a speeding vehicle Accident

See Latest Marathi NewsAhmednagar News and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here