Home महाराष्ट्र धक्कादायक! तृतीयपंथीयावर बंद खोलीत सामूहिक अनैसर्गिक अत्याचार

धक्कादायक! तृतीयपंथीयावर बंद खोलीत सामूहिक अनैसर्गिक अत्याचार

Crime News: Group unnatural abused in a closed room on a third party: दोन नराधमांनी 19 वर्षीय तृतीयपंथीयावर सामूहिक अनैसर्गिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना.

Group unnatural abused in a closed room on a third party

भिवंडी: एका खोलीत नेऊन बेदम मारहाण करत दोन नराधमांनी 19 वर्षीय तृतीयपंथीयावर सामूहिक अनैसर्गिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हा घटना भिवंडी शहरातील आजदनगर परिसरात असलेल्या एका खोलीत घडली आहे.

याप्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात दोघा नराधमांवर अनैसर्गिक अत्याचारासह विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तहाल सलीम खान (वय 23) आणि शाहिद (वय 25) असे गुन्हा दाखल झालेल्या नरधमांची नावे आहेत. लवकरात लवकर जर नराधमांना अटक केली नाही तर किनर अस्मिता संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

याबाबत सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की,  19 वर्षीय पीडित तृतीयपंथी भिवंडीत राहत असून दोन्ही नराधमही त्याच परिसरात राहत असल्याने पीडित ओळखत होती. त्यातच सहा जानेवारी रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास पीडित तृतीयपंथी  घरानजीक असलेल्या किराणा दुकानात दूध, अंडी पाव , आण्यासाठी गेला असता, त्या ठिकाणी परिसरात राहणाऱ्या दोघा नराधमाने छेड काढून एका खोलीत बळजबरीने घेऊन घेले व दारू पिण्यासाठी पीडितला आग्रह केला. मात्र त्याला नकार दिला. त्यानंतर नराधमाने तुझ्याकडे आमचे काम आहे. तुझ्याही काही बोलायचे आहे. असे बोलून पीडितला नराधम शहीद याने त्याच्या  खोलीचा आतून दरवाजा बंद करून पुन्हा पीडितला दारू पिण्यास आग्रह केला. मात्र पीडितने नकार देताच दोन्ही नराधमांनी बेदम मारहाण करून पीडित तृतीयपंथ्यावर बळजबरीने तीन ते चार तास आळीपाळीने अनसैर्गिक अत्याचार केले.

Business Idea | तुम्हाला तुमचा स्वतः चा बिजनेस सुरु करायचा मग हा व्हिडियो जरूर पहा

अनसैर्गिक अत्याचार केल्यानंतर  आज पहाटे चार वाजल्याच्या सुमारास पीडितला खोली बाहेर काढले. आणि घडलेल्या प्रकाराची कुठेही वाचता केली तर जीवे मारण्याची नराधमांनी  धमकी दिली. त्यानंतर पीडिताला बेदम मारहाण आणि अनसैर्गिक अत्याचाराचा त्रास असाह्य झाल्याने पीडितने घडलेला प्रसंग घरच्यांना व गुरुला सांगितला. त्यानंतर शांतीनगर पोलीस ठाणे गाठून  पीडितने पोलिसांसमोर घडलेल्या प्रसंगाचे कथन करताच दोन्ही नराधमांविरोधात, आज पहाटेच्या सुमारास भादंवि कलम ३७७, 324, 342, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करून पोलीस पथकाने  दोघांचा शोध सुरु केला आहे. किन्नर अस्मिता या संघटनेच्या वतीने न्याय मिळाला नाही तसेच आरोपीला लवकरात लवकर अटक झाली नाही तर किन्नर संघटनेच्या वतीने आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

Web Title: Group unnatural abused in a closed room on a third party

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here