Home नांदेड किरकोळ वादातून मित्रावर गोळीबार, पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली घटना

किरकोळ वादातून मित्रावर गोळीबार, पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली घटना

Gun Firing:  विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत किरकोळ वादातून मित्रावर गोळीबार करण्यात आल्याची घटना.

Gun Firing a friend over a petty dispute

नांदेड | Nanded: शहराच्या विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत किरकोळ वादातून मित्रावर गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेत संबंधित तरूण जखमी झाला असून त्याच्यावर जवळच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटेनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

शेख इरफान (वय, २५) असे गोळीबारात जखमी झालेल्या तरूणाचे नाव आहे. इरफान हा गुरुवारी रात्री नांदेड शहराच्या माळटेकडी परिसरातील नुरी चौक भागात ओली पार्टी करत होता. त्यावेळी झालेल्या किरकोळ वादातून इरफानच्या एका मित्राने त्याच्यावर गोळी झाली. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या इरफानला विष्णुपुरीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरूण पार्टी करत असताना खाण्या-पिण्याच्या वादातून त्याची आरोपीशी भांडण झाले. त्यानंतर राग अनावर झाल्याने आरोपीने त्याच्याजवळ असलेली गावठी पिस्तुल काढून इरफानवर गोळी झाडली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहे. शहरातील इतवारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन फायरिंगच्या घटना ताज्या असतानाच, पुन्हा नांदेड शहरामध्ये विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत फायरिंगची घटना घडल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Web Title: Gun Firing a friend over a petty dispute

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here