Home क्राईम संगमनेर तालुक्यात गुटखा विक्रेत्यांवर कारवाई, छाप्यात तेरा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

संगमनेर तालुक्यात गुटखा विक्रेत्यांवर कारवाई, छाप्यात तेरा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

Sangamner Crime:  अन्न औषध प्रशासनाने छापा (Raid) टाकत कर्जुले पठार भागात सुरू असलेल्या अवैध गुटखा विक्रेत्यांवर कारवाई केल्याची घटना. दोन जणावर घारगाव पोलिसात गुन्हा दाखल. 13 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त.

gutkha sellers in Sangamner taluka, goods worth thirteen thousand rupees seized in the raid

संगमनेर:  संगमनेर तालुक्यातील कर्जुले पठार भागात सुरू असलेल्या अवैध गुटखा विक्रेत्यांवर अन्न औषध प्रशासनाने छापा टाकत कारवाई केली. दि. 18 रोजी दुपारी 1 वाजताच्या सुमारास ही कारवाई केली. या कारवाईत दोन जणावर घारगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 13 हजार 200 रुपया मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकास  अटक केली तर दुसरा फरार झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अन्न व औषध प्रशासनास गुप्त माहितीद्वारे विक्रीसाठी  साठवणूक करून ठेवलेल्या अवैध गुटका दुकांनाची व घराची माहिती मिळाली. त्यानुसार मंगळवारी दुपारी कर्जुले पठार शिवारात पुणे- नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील गुरुदत्त मंगल कार्यालयासमोरील चंद्रकांत शिवाजी घुले यांच्या मालकीचे में सुदर्शन ट्रेडर्सवर पथकाने छापा टाकत घराची व दुकानाची तपासणी केली.

यावेळी राज्यात प्रतिबंधित केलेला हिरा पान मसाला, आरएमडी पान मसाला, एम सेंटेड टोबॅको, रॉयल 717 सुगंधित तंबाखू, विमल पान मसाला असा विना परवाना मुद्देमाल विक्रीसाठी साठवून ठेवलेला आढळून आला. यात एकूण 13 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याचे सांगण्यात आले. अन्न व औषधच्या थकाने अवैध गुटखाचा साठा जप्त करून त्याना घारगाव पोलिसाच्या ताब्यात दिले. चौकशी केली असता गुटखा पुरवठादार प्रभाकर गुळवे यांचे नाव समोर आले. जनहित व जनआरोग्याच्या दृष्टीने चंद्रकांत घुले व प्रभाकर गुळवे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक संतोष खेडकर करत आहे.

Web Title: gutkha sellers in Sangamner taluka, goods worth thirteen thousand rupees seized in the raid

Sangamner Akole News Whats app Marketing

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here