Home संगमनेर संगमनेर: २१ वर्षीय विवाहितेचा छळ; आठ जणांविरोधात गुन्हा दाखल

संगमनेर: २१ वर्षीय विवाहितेचा छळ; आठ जणांविरोधात गुन्हा दाखल

Breaking News | Sangamner Crime: घर घेण्यासाठी वडिलांकडून आठ लाख रुपये आणावेत. तसेच तुझे घरच्यांनी आमचा मानपान व्यवस्थित केला नाही, माहेरहून दागदागिने घेऊन ये, असे म्हणत २१ वर्षीय विवाहितेला उपाशी ठेवून तिची शारीरिक, मानसिक छळवणूक.

Harassment of 21-year-old married crime filed

संगमनेर : घर घेण्यासाठी वडिलांकडून आठ लाख रुपये आणावेत. तसेच तुझे घरच्यांनी आमचा मानपान व्यवस्थित केला नाही, माहेरहून दागदागिने घेऊन ये, असे म्हणत २१ वर्षीय विवाहितेला उपाशी ठेवून तिची शारीरिक, मानसिक छळवणूक करण्यात आली. याप्रकरणी विवाहितेने संगमनेर शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून तिचा पती, जाव, सासू आदी, अशा एकूण आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

शाहरुख इमाम शेख, नवशीन मोहसीन शेख, आशपाक इमाम शेख, मोहसीन इमाम शेख, फिरोज इमाम शेख, सलमान इमाम शेख, शाहनवाज इमाम शेख, मोहंमद जाफर इमाम शेख (सर्व रा. सय्यद बाबा चौक, संगमनेर), अशी गुन्हा दाखल झालेल्या आठ जणांची नावे आहेत. त्यांच्याविरोधात उजमा शाहरुख शेख (वय २१, रा. सय्यद बाबा चौक, कुरण, ता. संगमनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे. २३ जानेवारी २०२३ ते १४ जानेवारी २०२४ पर्यंत ही घटना घडली.

उजमा शेख या सासरी नांदत असताना राहायला घर नसल्याने तुझ्या वडिलांकडून घर घ्यायला आठ लाख रुपये घेऊन ये, असे म्हणत त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. तसेच मुलांना लग्नात कपडे घेतले नाही, यावरूनही शिवीगाळ करण्यात आली, आदी कारणांनी शारीरिक, मानसिक छळवणूक करण्यात आली. पोलिस ठाण्यात तक्रार केल्यास जिवे मारून टाकण्याची धमकीही देण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Web Title: Harassment of 21-year-old married crime filed

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here