Home कोल्हापूर हसन मुश्रीफ यांच्या अडचणी वाढणार? अध्यक्ष असलेल्या जिल्हा बँकेवर ईडीची धाड

हसन मुश्रीफ यांच्या अडचणी वाढणार? अध्यक्ष असलेल्या जिल्हा बँकेवर ईडीची धाड

Hasan Mushrif: मुश्रीफ अध्यक्ष असलेल्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर ईडीने धाड ( ED Raid).

Hasan Mushrif's problems will increase ED raid Zilla bank headed by chairman

कोल्हापूर: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कारण, मुश्रीफ अध्यक्ष असलेल्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर ईडीने धाड टाकली आहे. माहितीनुसार, आज सकाळी ED चे अधिकारी जिल्हा बँकेत आले आणि सकाळपासूनच कागदपत्रांची पडताळणी सुरू केली आहे

विशेष बाब म्हणजे गेल्या महिन्यातही मुश्रीफ यांच्यावर कोल्हापुरातील घरावर ईडीने धाड टाकली होती. या धाडीत २५ अधिकारी सामील झाले होते. सुमारे ११ तासांच्या चौकशीनंतर हे अधिकारी रिकाम्या हाताने परतले होते. मात्र, आज ईडीचे अधिकारी पुन्हा कोल्हापुरात आले. यावेळी त्यांनी मुश्रीफ हे अध्यक्ष असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवरच धाड टाकून झाडाझडती सुरू केली आहे.

अचानक बँकेत ईडीचे अधिकारी घुसल्याने कर्मचाऱ्यांची एकच तारांबळ उडाली. त्यांनी संबधित कागदपत्रांची तपासणी सुरु केली. दरम्यान, ईडी अधिकारी बँकेत दाखल झाल्याचे कळताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ते बँकेच्या आवारात जमा झाले आहेत. कोल्हापूर जिल्हा बँकेवर ईडी अधिकाऱ्यांनी धाड टाकल्यामुळे राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ) यांच्या अडचणी पुन्हा वाढणार असल्याचे समोर येत आहे.

Web Title: Hasan Mushrif’s problems will increase ED raid Zilla bank headed by chairman

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here