Home संगमनेर Theft: संगमनेरात स्फोटकांचा वापर करीत एचडीएफसी बँकेचे एटीम फोडले

Theft: संगमनेरात स्फोटकांचा वापर करीत एचडीएफसी बँकेचे एटीम फोडले

HDFC Bank ATMs blown up in Sangamner theft

Sangamner | संगमनेर: संगमनेर शहरालगत अमृतवाहिनी कॉलेज समोरील एचडीएफसी बँकेचे एटीम स्फोटकांचा वापर करून अज्ञात चोरट्यांनी (Theft) फोडल्याची घटना घडली आहे. चोरट्यांनी २० लाख ७७ हजार ५०० रुपये रक्कम चोरून नेल्याची घटना घडली. यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत संगमनेर शहर पोलीस ठानायात दोन अज्ञात इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजीव कुमार ओमकार यांनी याबाबत फिर्याद दाखल केली आहे.

संगमनेर शहरापासून काही अंतरावर अमृतवाहिनी कॉलेजसमोर एचडीएफसी बँकेचे एटीम असून सध्या या परिसरात रस्त्याचे काम सुरु आहे. रस्त्यांच्या कामांमुळे काहीतरी स्फोटकांचा आवाज झाला असावा असा स्थानिक नागरिकांना वाटले असावे. मात्र याचाच फायदा घेत एचडीएफसी बँकेचे एटीम फोडून पैसे लंपास केले.

याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुकुंद डेस्क=देशमुख व उप विभागीय अधिकारी राहुल मदने यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. पोलिसांचे दोन पथके रवाना करण्यात आले आहे.

Web Title: HDFC Bank ATMs blown up in Sangamner theft

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here