Home अहमदनगर Accident | अहमदनगर | कंटेनर आणि मालवाहतूक ट्रकचा समोरासमोर भीषण अपघात

Accident | अहमदनगर | कंटेनर आणि मालवाहतूक ट्रकचा समोरासमोर भीषण अपघात

head-on collision between a container and a freight truck Accident

Ahmednagar | श्रीगोंदा | Shrigonda:  श्रीगोंदा तालुक्यातील कन्हेरवळ येथे कंटेनर आणि एका मालवाहतूक ट्रकच्या समोरासमोर झालेल्या भीषण अपघात (Accident) झाला. या अपघातात ३ जण गंभीर जखमी झाले आहेत. एका जणाची स्थिती गंभीर आहे.

याबाबत अधिक  माहिती अशी की,  नगरकडून दौंडकडे भरधाव वेगाने जाणारा मालवाहतूक कंटेनर (क्र. एम.एच.०६ ए क्यू ८४२२) आणि दौंडकडून नगरकडे भरधाव वेगाने जाणारी माल वाहतूक ट्रक (क्र. के ए.२८ ए ए ५३६३) यांची कोळगाव येथील कन्हेरवळ परिसरात समोरासमोर भीषण धडक झाली. दोन्ही वाहनांचा अपघात इतका भीषण होता की,  या अपघातात कंटेनरच्या केबिनचा अक्षरशः चुराडा होऊन कंटेनर चालकाचे दोन्ही पाय निकामी झाले असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. तर ट्रकचा चालक आणि दोन्ही गाड्यांचे क्लिनर गंभीर जखमी झाले आहेत.

या परिसरातील रस्त्याचे काम अपूर्ण असल्याने भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनांना रस्त्याचा अंदाज येत नसल्याने अपघात होत असतात. या अपघातात अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे.

Web Title: head-on collision between a container and a freight truck Accident

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here