सूर्य कोपला; नगर जिल्ह्यात उष्माघाताने एकाचा मृत्यू
Ahmednagar | रांजणखोल: गेल्या काही दिवसांपासून राज्यातील उकाडा वाढत चालला आहे. तापमानाचा पारा चांगलाच वाढला आहे. उन्हामुळे (heat Wave) नागरिकांची लाहीलाही होत असल्यामुळे अनेकांनी घराबाहेर जाण्यास टाळाटाळ करीत आहे. अशातच एकाचा वृद्ध व्यक्तीचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
श्रीरामपूर-संगमनेर रोडवरील महाबीज खंडाळा येथे उष्माघाताने एका वृद्ध व्यक्तीचा बळी गेला आहे. सदर मयत व्यक्तीच्या खिशात वरील फोटो सापडला असल्याची माहिती टिळकनगर पोलीस स्टेशनच्या वतीने देण्यात आली आहे. मात्र या मृत व्यक्तीची ओळख अजून पटलेली नाही.
Web Title: Heat Wave One dies of heatstroke in Nagar