Home अहमदनगर अहमदनगर: जिल्ह्यात पुन्हा अतिवृष्टीचा इशारा, सतर्कतेचा इशारा

अहमदनगर: जिल्ह्यात पुन्हा अतिवृष्टीचा इशारा, सतर्कतेचा इशारा

Ahmednagar Rain: जिल्ह्यात ११५.७ टक्के पाऊस : सोमवारी दिवसभर संततधार.

heavy rain again in the district, warning of vigilance

अहमदनगर:  भारतीय हवामान विभागाने जिल्ह्यात १९ ते २१ सप्टेंबर २०२२ या कालावधीत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. जिल्ह्यातून वाहणाऱ्या सर्वच नद्यांना पूर आला असून धरणांमधूनही पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाने सावधानतेचा इशारा दिला आहे.

जिल्ह्यातून वाहणाऱ्या गोदावरी नदीत नांदुरमध्यमेश्वर बंधाऱ्यातून ३५ हजार २७६ क्यूसेस व जायकवाडी धरणातून ८० हजार १७२ क्यूसेस, भीमा जिल्हा नदीस दौंड पूल येथे ३६ हजार ८७४ क्युसेस, घोडनदीत घोड धरणातून १६ हजार १०० क्युसेस व प्रवरा नदीत भंडारदरा धरणातून २ हजार ३२ क्युसेस, निळवंडे धरण ३ हजार ५१४ क्यूसेस व ओझर बंधारा ८ हजार ३२७ क्यूसेस, मुळा नदीत मुळा धरणातून ७ हजार क्यूसेस आणि कुकडी नदीत येडगाव धरणातून ७०० क्यूसेस पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे.

सध्या जिल्ह्यात सुरू असलेला संततधार पाऊस, धरणांमधून नद्यांमध्ये सोडण्यात आलेला विसर्ग पाहता आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातर्फे जिल्ह्यातील नागरिकांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. सखल भागात राहणाऱ्या नागरिकांनी तत्काळ सुरक्षितस्थळी स्थलांतर करावे. असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य स्थलांतर करावे.

जिल्ह्यात आजपर्यंत ५१८.६ मि.मी. ( ११५.७ % ) पर्जन्यमान झालेले आहे. वादळी वारा, मेघगर्जनेसह वीजा पडणे व मध्यम स्वरूपाच्या पर्जन्यमानाची शक्यता वर्तविण्यात आलेली असून अहमदनगर जिल्ह्यासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. अहमदनगर, पुणे व नाशिक जिल्ह्यातील विविध धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पर्जन्यमान सुरू आहे. अतिवृष्टी झाल्यास धरणाद्वारे सोडण्यात येणाऱ्या विसर्गामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. नदी, ओढे व नाल्याकाठच्या नागरिकांनी दक्ष राहावे. पाणीपातळीत वाढ होत असल्यास नदीपात्रापासून तसेच ओढे व नाले यापासून दूर रहावे व सुरक्षितस्थळी

Web Title: heavy rain again in the district, warning of vigilance

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here