Home अकोले अकोले: फळविहीरवाडीचा बंधारा फुटला, ४० विहिरी गाडल्या, मोठे नुकसान

अकोले: फळविहीरवाडीचा बंधारा फुटला, ४० विहिरी गाडल्या, मोठे नुकसान

Akole News: ढगफुटी सदृश्य पाउस झाल्याने मोठे नुकसान.

Heavy Rain embankment of Phalvihirwadi burst, 40 wells buried

अकोले: अकोले तालुक्यातील एकदरा परिसर व इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागात ढगफुटी सदृश्य पाउस झाल्याने मोठे नुकसान झाले आहे.  यामुळे फळविहीरवाडी येथील बंधारा फुटला असून किमान 150 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्राचे नुकसान झाले आहे. 40 विहिरी गाडल्या असून भात शेती आणि काही घरांचे बंधार्‍याच्या पाण्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. फळविहीर वाडीला जाणारा रस्ता सुद्धा वाहून गेला आहे. ह्या गावासह परिसरातील गावांनाही पावसाचा मोठा फटका बसला असून शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.

प्रशासनाने तातडीने ह्या भागातील शेतीचे तसेच इतर झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून, नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना, ग्रामस्थांना युद्धपातळीवर आर्थिक भरपाई द्यावी, अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य हरिदास लोहकरे, बाळासाहेब गाढवे इत्यादींनी केली आहे. नुकतीच माजी आदिवासी विकास मंत्री मधुकरराव पिचड यांनी या भागाला भेट देऊन आदिवासी विकास विभागातून मदत करण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आदिवासी विकास मंत्री यांना भेटून तसेच मोबाईलवर संपर्क साधून मदत करण्याविषयी आग्रह धरणार असल्याचे श्री. पिचड यांनी म्हटले आहे.

Web Title: Heavy Rain embankment of Phalvihirwadi burst, 40 wells buried

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here