Home Maharashtra News Rain! राज्यात या जिल्ह्यांत मुसळधार पाउस, पिकांचे नुकसान

Rain! राज्यात या जिल्ह्यांत मुसळधार पाउस, पिकांचे नुकसान

Heavy rain in these districts of the Maharashtra

सातारा:  सातारा, सांगली, रत्नागिरीसह सोलापूर जिल्ह्यात वादळी वा-यासह गुरुवारी रात्री पावसाने (Rain) हजेरी लावली. आज (शुक्रवार) सकाळपासून या जिल्ह्यांत पावसाच्या सरी कोसळत आहे. दरम्यान गुरुवारी झालेल्या पावसामुळे सांगली जिल्ह्यात वळसंग ते पाचापुर पुलावरून पाणी गेल्याने रस्ता बंद झाला आहे. या पुलावरून पाणी गेल्याने जत पूर्व भागाचा संपर्क तुटला आहे. हवामान खात्याने सोलापूर तसेच सातारा जिल्ह्यात आज वादळी वा-यासह पावसाची शक्यता वर्तवली आहे.

सांगली जिल्ह्यात गुरुवारी सायंकाळ पासून पाउस सुरु झाला आहे. विशेषत: जत या दुष्काळी भागात मुसळधार पाउस झाला. यामुळे अनेक ओढे नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. वळसंग ते पाचापुर पुलावरून पाणी गेल्याने रस्ता बंद झाला आहे. या पुलावरून पाणी गेल्याने जत पूर्व भागाचा संपर्क तुटला आहे.

सोलापूर शहरात गुरुवारी दुपारपासून मुसळधार पाऊस झाला. गेल्या २४ तासात सोलापुरात ३६.१ मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे. सततच्या पावसामुळे शहरातील विजापूर रोड येथील नेहरू नगर शासकीय मैदानाला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. दरम्यान पंढरपूरात आजही पहाटे पासून पावसाची संततधार सुरु होती. वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. यामध्ये शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात आज सकाळपासूनच मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळल्या.  दक्षिण आणि उत्तर रत्नागिरी जिल्ह्यात दमदार पाऊस झाला. या पावसामुळे अखेरच्या टप्प्यातील आंब्याचे मोठे झाले आहे. जिल्ह्यात पुढील दोन दिवस पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

Web Title: Heavy rain in these districts of the Maharashtra

Previous articleसंगमनेर: पुणे नाशिक महामार्गावर मक्याची कणसे घेऊन जाणारा टेम्पो पलटी होऊन अपघात- Accident
Next articleआजचे राशिभविष्य: जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here