Home नागपूर शरीरसंबंध प्रस्थापित करून बलात्काराचा आरोप करीत खंडणी वसुली करणारे बंटी बबली अटकेत...

शरीरसंबंध प्रस्थापित करून बलात्काराचा आरोप करीत खंडणी वसुली करणारे बंटी बबली अटकेत  

Honey Trap Case Bunty Babli arrested for raping a woman

नागपूर | Nagpur: प्रेमाच्या जाळ्यात ओढत शरीरसंबध प्रस्थापित करून नंतर बलात्काराचा (Rape) आरोप लावून खंडणी वसूल करत असणाऱ्या  (honey Trap) एका कुख्यात महिलेसह तिच्या साथीदाराला जरीपटका पोलिसांनी जेरबंद केले आहे.

मेघाली उर्फ भाविका वय ३५ आणि मयूर राजू मोटघरे वय २७ अशी या दोघांची नावे आहेत. बंटी बबली या नावाने कुख्यात आहेत. तिच्या जाळ्यात अडकलेला व्यक्ती भाजीचा व्यवसाय करीत असे. अनेक दिवसांपासून मेघाली त्या व्यक्तीकडे भाजी घ्यायला जात होती. त्यामुळे त्यांच्यात ओळख होऊन मैत्री झाली पुढे भेटी गाठी वाढल्या. मेघालीने पतीच्या अत्याचारामुळे आपण एकटीच भाड्याच्या घरात राहते असे सांगून त्याला आपल्या जाळ्यात ओढले. त्याच्यासोबत शरीरसंबंध प्रस्थापित केले. वारंवार शरीरसंबध प्रस्थापित करून लग्न कर अन्यथा तुला बलात्काराच्या आरोपात अडकवेल अशी धमकी दिली. त्यामुळे लग्न करून तो तिच्यासोबत राहू लागला मात्र आठच दिवसांत तिने त्याला कुटुंब सोडण्यास आणि भाड्याचे घर घेण्यास बाध्य केले. त्यानंतर अचानक तो घरी आला असता त्यावेळी त्याला मेघाली आणि तिचा जोडीदार मोटघरे शरीरसंबध जोडताना दिसून आले. त्यामुळे मेघालीसोबत त्या व्यक्तीचे कडाक्याचे भांडण झाले. आणि त्याने तिच्याशी नाते तोडले. त्यानंतर मेघालीने त्या व्यक्तीविरोधात बलात्काराच्या आरोपाखाली जरीपटका ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी त्या व्यक्तीला अटक करून कारागृहात टाकले. त्यानंतर मेघाली अधिकच आक्रमक होत. कारागृहात भेटून त्या व्यक्तीकडे पैशाची मागणी केली. नाही दिल्यास तुझी जमानत होऊ देणार नाही. तुझा खून करून अशीही धमकी देत २ लाख १० हजार रुपये उकळले.

मेघालीने आतापर्यंत वर्धा आणि एमआयडीसीतील एका उद्याजाकासह एक डझनपेक्षा अधिक जणांना Honey Trap मध्ये अडकवून लाखो रुपये उकळल्याची चर्चा आहे. तिने मोटघरेच्या मदतीने वर्धा, नंदनवन, लकडगंज, बुटीबोरी आणि जरीपटका ठाण्यात तक्रार नोंदवून बलात्काराच्या आरोपात अडकविले. आता मात्र तीच पोलिसांच्या जाळ्यात अडकल्याने मोठे खुलासे बाहेर येण्याची शक्यता आहे.

Web Title: Honey Trap Case Bunty Babli arrested for raping a woman

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here