महिला व्यावसायिकाला पंचतारांकित हॉटेलात भेटली, अत्याचार अन, चक्क कोंबडीचं रक्त लावलं
Honey Trap Case: वसायिकाने मुंबईतील एका पंचतारांकित तिला बोलावून तिच्यावर लैंगिक अत्याचार, एक व्हिडीओ देखील शूट केला होता. त्याद्वारे ब्लॅकमेल करीत तिने 3.25 कोटीच्या खंडणीची मागणी.
मुंबई: सध्या हनीट्रॅप चा प्रकार कायमच पाहायला मिळतो असाच एक हनी ट्रॅप एका महिलेने एका कोल्हापूरातील एका व्यावसायिकाविरोधात लावला होता. या घटनेने खळबळ उडाली आहे. यात महिलेने असा आरोप केला की व्यावसायिकाने मुंबईतील एका पंचतारांकित तिला बोलावून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. महिलेने तक्रार केली आणि रक्ताबंबाळ झाल्याचे पुरावे सादर केले. व्यावसायिकाचे संपूर्ण आयुष्य उद्धवस्त होण्याची वेळ आली, परंतू मुंबई पोलिस याप्रकरणाच्या मुळाशी पोहचले तर धक्कादायक सत्य समोर आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, साल 2019 रोजी एक व्यापारी मुंबईतील फाईव्ह स्टार हॉटेलात थांबला होता. तेथे त्याने आपल्याला बोलावल्याचा आरोप मोनिकाने लावला होता. तेथे व्यापाऱ्याने आपली लैंगिक छळवणूक केल्याचा आरोप मोनिकाने केला होता. त्याने आपल्याला मारहाण केल्याने आपण जखमी झाले असल्याचे तिने म्हटले होते. त्यानंतर तिने एक व्हिडीओ देखील शूट केला होता.त्याद्वारे ब्लॅकमेल करीत तिने 3.25 कोटीच्या खंडणीची मागणी केली होती.
पोलिसांनी सांगितले की ही ब्लॅकमेल कहाणी साल 2017 मध्ये सुरु झाले होते. अनिल चौधरी आणि सपना यांनी या व्यापाऱ्याशी मैत्री करीत त्याची सर्व माहीती काढली. त्यानंतर त्यांनी त्याला फसविण्याची योजना आखली. ही घटना साल 2019 रोजी घडली. त्यानंतर या प्रकरणाचा तपास केल्यानंतर मोनिका चौधरी, तिचे मित्र अनिल चौधरी उर्फ आकाश, फॅशन डीझाईनर लुबना वजीर उर्फ सपना आणि ज्वेलर मनीष सोदी यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल केले. पोलिस तपासात तिच्या हाताला लावलेले रक्त हे कोंबडीचे असल्याचे फोरेन्सिक तपासात स्पष्ट झाले.
Web Title: Honey trap Case Met a female businessman in a five-star hotel, raped her
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App