संगमनेर: मुळा नदीपात्रात हॉटेलचा कामगार बुडाला
Breaking News | Sangamner: घारगाव येथे मुळा नदीपात्रातील पाण्यात हॉटेलचा कामगार बुडाल्याची दुर्दैवी घटना.
संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील घारगाव येथे मुळा नदीपात्रातील पाण्यात हॉटेलचा कामगार बुडाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी दि. ९ रोजी दुपारी घडली आहे. परिसरात एकच गर्दी झाली होती.
नुकतेच मुळा नदीला पिण्याच्या पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले आहे. त्यामुळे मुळा नदीपात्रात पाणी आहे. शुक्रवारी दुपारी घारगाव स्मशान परिसरातील पाणवठ्यावर हॉटेल समाधानचा कामगार बिद्युतनाथ मदरबुय्या हा बुडाला आहे. ही माहिती समजताच नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. पोलीस निरीक्षक संतोष खेडकर, प्रमोद गाडेकर घटनास्थळी पोहोचले होते. परिसरातील पट्टीचे पोहोणारे नदीपात्रात शोधकार्य सुरु आहे. मात्र आढळून येत नसल्याने रेस्कू पथकाची आवश्यकता असल्याचे बोलले जात आहे.
Web Title: hotel worker drowned in the Mula riverbed
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study