Home क्राईम एचआर एक्सेक्यूटिव्ह तरूणीकडे शरीरसुखाची मागणी, धक्कादायक प्रकार

एचआर एक्सेक्यूटिव्ह तरूणीकडे शरीरसुखाची मागणी, धक्कादायक प्रकार

Pune Crime: फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये एचआर म्हणून काम करत असलेल्या तरूणीचा विनयभंग (Molested) झाल्याचा प्रकार समोर आला आहे. तरूणीकडे शरीर सुखाची मागणी (demand to Sex).

HR Executive Demands to sex Young Woman

पुणे: पुण्यातील प्रसिद्ध फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये एचआर म्हणून काम करत असलेल्या तरूणीचा विनयभंग झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्याच हॉटेलमध्ये मॅनेजर असणाऱ्या एकाने या तरूणीकडे शरीर सुखाची मागणी केली आणि या प्रकाराविषयी कुणाला सांगितल्यास ठार मारण्याची धमकीही त्यानं दिली. या सर्व प्रकारानंतर या तरूणीनं घडल्या प्रकाराबद्दल पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली आहे. मुंढवा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राहुल पांडुरंग सानप (वय 32, बीटी कवडे रोड) आणि विनोद पवार (वय 38, केशवनगर, मुंढवा) अशी गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे आहेत.

Business Idea | तुम्हाला तुमचा स्वतः चा बिजनेस सुरु करायचा मग हा व्हिडियो जरूर पहा

याबाबत अधिक माहिती अशी की, एका 25 वर्षीय तरुणीने या प्रकरणी फिर्याद दाखल केली आहेफिर्यादी या मुंढवा परिसरातील एका प्रसिद्ध फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये एचआर म्हणून काम करतात तर आरोपी राहुल सानप हा त्याच हॉटेलमध्ये मॅनेजर पदावर नोकरी करतो. सप्टेंबर महिन्यापासून आरोपी फिर्यादीला त्रास देत होता. फिर्यादी महिलेला केबिनमध्ये बोलावून घेत, ”तू खूप सुंदर दिसते, तुझे पाय किती भारी आहेत, माझे घर खूप मोठे आहे का, रात्री माझ्या घरी चल आपण सेक्स करू असे बोलून तिच्याजवळ जाऊन त्यानं अश्लील चाळे केले तर दुसऱ्या आरोपीनं राहूलनं जं काही केलं ते कोणाला सांगायचे नाही, अन्यथा आम्ही तुला खल्लास करून टाकू अशी धमकी दिली. इतकेच नाही तर फिर्यादी घरी जात असताना आरोपींनी त्यांचा पाठलाग करून कोणाला काही सांगितल्यास खल्लास करून टाकण्याची धमकी दिली होती. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस करत आहेत. 

Web Title: HR Executive Demands to sex Young Woman

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here