Home क्राईम प्रेयसीसोबत राहण्यासाठी पतीने पत्‍नीसोबत केले धक्कादायक कृत्य

प्रेयसीसोबत राहण्यासाठी पतीने पत्‍नीसोबत केले धक्कादायक कृत्य

Pimpri Chinchwad Crime : प्रेयसीसोबत आपल्याला एकत्र राहता यावे; यासाठी प्रेयसीसोबत मिळून स्वतः च्याच पत्‍नीवर पतीने चाकू हल्ला केल्याची घटना.

husband commits a shocking act with his wife to be with his girlfriend

पिंपरी चिंचवड: शहरातील चिंबळी परिसरातील बनकरवस्ती येथे एका माथेफिरू पतीने आपल्या पत्नीवर चाकू हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात पत्नी गंभीर जखमी झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रेमप्रकरणातून पतीकडून पत्‍नीचा तर कधी पत्‍नीकडून पतीला जीवे मारले जाते. अशाच प्रकारचा प्रकार पिंपरी चिंचवड शहरातील चिंबळी परिसरात समोर आला आहे. लग्‍नानंतर संसार सुरू असताना प्रेयसीसोबत संबंध होते. यातूनच पत्‍नीवर चाकूने हल्‍ला केल्‍याचा प्रकार झाला आहे. या प्रकरणात आळंदी पोलीसांनी समीर लतिफ पठाण (वय २८) हा पतीवर आणि त्याच्या प्रेयसी विरोधात खुनाचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल केला आहे.

प्रेयसीसोबत आपल्याला एकत्र राहता यावे; यासाठी प्रेयसीसोबत मिळून स्वतः च्याच पत्‍नीवर पतीने चाकू हल्ला केला आहे. ह्या हल्ल्यात पत्नी गंभीर जखमी झाली असुन तिच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. मात्र चाकू हल्ला करणारा आरोपी समीर पठाण आणि त्याची प्रेयसी अजूनही फरार आहेत.

Web Title: husband commits a shocking act with his wife to be with his girlfriend

Sangamner Akole News Whats app Marketing

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here