Home अकोले राजूर: `संमोहन ही मानसिक प्रक्रिया` – संमोहनतज्ज्ञ मुकुंद देंडगे

राजूर: `संमोहन ही मानसिक प्रक्रिया` – संमोहनतज्ज्ञ मुकुंद देंडगे

Rajur: राजूर येथील गुरुवर्य रा. वि. पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालयात  व्याख्यानमालेत ‘तणावमुक्त जीवनासाठी संमोहन’ या विषयावर व्याख्यान व प्रयोग. (Hypnosis is a mental process)

Hypnosis is a mental process

राजूर: संमोहन हे बाह्यमनाला स्थिर करणारे शास्त्र आहे. तर्कवितर्कामध्ये बाह्यमन गुरफटून जाते तेव्हा त्याला जडत्व देऊन अंतर्मनाला जागे करण्याचे काम संमोहन करते.

संमोहन हे बाह्यमनाला स्थिर करणारे शास्त्र आहे. तर्कवितर्कामध्ये बाह्यमन गुरफटून जाते तेव्हा त्याला जडत्व देऊन अंतर्मनाला जागे करण्याचे काम संमोहन करते. ती एक मानसिक प्रक्रिया असली तरी भावभावनांचा निचरा करण्याचा तो राजमार्ग आहे, असे प्रतिपादन संमोहनतज्ज्ञ मुकुंद देंडगे (प्रभारी उप शिक्षणाधिकारी पुणे) यांनी केले.

राजूर येथील गुरुवर्य रा. वि. पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालयात  व्याख्यानमालेत ‘तणावमुक्त जीवनासाठी संमोहन’ या विषयावर ते बोलत होते. हे व्याख्यान विद्यार्थ्यांच्या कला  गुणांना वाव मिळण्यासाठी तसेच मनाचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी प्राचार्य एम.डी. लेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली उप प्राचार्य बी.एन. ताजणे यांनी आयोजित केले होते. सत्यानिकेतन संस्थेचे संचालक विजय पवार यांनी पाहुण्यांचा सत्कार केला. प्रास्ताविक जेष्ठ शिक्षक डी.जी.बुऱ्हाडे यांनी केले. 

मुकुंद देंडगे पुढे म्हणाले की, मनाचे दोन प्रकार असतात. अंतर्मन ही फुलांची बाग असेल तर बाह्यमन म्हणजे या बागेचे रक्षण करणारा माळी असतो. अंतर्मनात काही कुविचार शिरू न देणे हे बाह्यमनाचे काम असते. निसर्गाने स्वतंत्र विचार करण्याचे सामर्थ्य दिले आहे परंतु ते विचार सकारात्मक असावे यासाठी आपणच प्रयत्न करावयाचे असतात. कळते पण वळत नाही यातील वळत नाही त्याला वळवण्याचे काम, मनाला ताब्यात घेण्याचे काम संमोहन करते असेही ते म्हणाले.

Earn Money Online | स्मार्टफोनचा वापर करून ऑनलाईन कमाई | लाईफटाईम इनकम

मुकुंद देंडगे पुढे म्हणाले की, तुम्ही सतत करीत असलेला विचार अचानक अंतर्मनात निघून जातो. त्यामुळेच समस्या निर्माण होतात. परंतु या समस्या नष्ट करण्याचे सामर्थ्यही याच विचारांमध्ये असल्याचेही ते म्हणाले. अंतर्मनात गेलेले विचार शारीरिक व मानसिक बदल घडवून आणतात. त्यामुळे सकारात्मक विचार करा असा सल्लाही मुकुंद देंडगे यांनी दिला. व्याख्यानादरम्यान मुकुंद देंडगे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांवर संमोहनाचे प्रात्यक्षिक करीत त्याची अंमलबजावणी कशी करतात हे दाखवून दिले.

Web Title: Hypnosis is a mental process

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here