Home नाशिक अनैतिक संबंधात अडसर: प्रियकराच्या मदतीने पत्नीने केली पतीची हत्या- Murder

अनैतिक संबंधात अडसर: प्रियकराच्या मदतीने पत्नीने केली पतीची हत्या- Murder

immoral relationship Wife kills husband with the help of boyfriend

मनमाड:  अनैतिक संबधात (immoral relationship) अडसर ठरत असणाऱ्या पतीचा प्रियकराच्या मदतीने काटा काढल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नापूर्वी प्रियकरासोबत असलेल्या संबध असल्याने  आपल्या जीवनसाथीचा खून (Murder) केल्याची घटना घडली आहे. या घटनेने मालेगावच्या टाकळी गावात खळबळ उडाली आहे.

दीपक हिरामण सूर्यवंशी असे खून केलेल्या पतीचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी अवघ्या 24 तासात या हत्येचा छडा लावून पत्नी रोहिणी दीपक सूर्यवंशी आणि तिचा प्रियकर रवींद्र पवारला ताब्यात घेतले आहे. दीपक हिरामण सूर्यवंशी असे मयताचे नाव आहे.

दीपकचा रोहिणी सोबत विवाह झाला होता. मात्र रोहिणीचे रविंद्र पवार या तरुणासोबत अनैतिक संबंध होते. या संबंधात रोहिणीचा पती दीपक त्यांना अडसर ठरत होता. त्यामुळे या दोघांनी संगनमताने दीपकचा काटा काढायचं ठरवलं. ठरल्या प्रमाणे बुधवारी रात्री दीपकचा गळा आवळून हत्या करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. याबाबत पोलिसांनी तपास करीत पत्नी रोहिणीची कसून चौकशी केली अवघ्या 24 तासात घडलेला प्रकार समोर झाला. पोलिसांनी संशयित आरोपी रविंद्र पवार व पत्नी रोहिणी सूर्यवंशीला अटक केली असून  पोलिसांचा खाक्या दाखविताच गुन्हा कबुल केला आहे.  

Web Title: immoral relationship Wife Murder husband with the help of boyfriend

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here