Home अकोले सलग सुट्ट्या, भंडारदरा धरणावर येणाऱ्या पर्यटकांसाठी महत्त्वाची बातमी, नक्की वाचा…मगच निघा

सलग सुट्ट्या, भंडारदरा धरणावर येणाऱ्या पर्यटकांसाठी महत्त्वाची बातमी, नक्की वाचा…मगच निघा

Ahmednagar News: भंडारदरा धरणावरही मोठी गर्दी होण्याची शक्यता.

Important news for tourists coming to Bhandardara Dam

अहमदनगर: स्वातंत्र्य दिनाला जोडून सलग सुट्ट्या आलेल्या आहेत. पर्यटकांची संख्या वाढणार आहे. भंडारदरा धरणावरही मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अहमदनगर पोलिसांनी १३ ते १६ ऑगस्ट या काळात वाहतुकीसंबंधी आदेश जारी केला आहे.

संभाव्य गर्दी तसेच पावसामुळे खराब झालेले रस्ते, आधीच या भागातील अरूंद रस्ते यामुळे वाहतुकीची कोंडी होण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेऊन पोलिसांनी वाहतूक व्यवस्थेत तात्पुरता बदल केला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी हा आदेश दिला.

पर्यटकांनी दंड आणि त्रास टाळण्यासाठी भंडारदरा धरण भागात येण्यापूर्वीच याची माहिती ठेवणे आवश्यक आहे. या भागात एकेरी वाहतूक करण्यात आली असून अत्यावश्यक सेवा आणि शासकीय वाहनांना वगळण्यात आले आहे.

असा असणार मार्ग:

  • रंधा फाटा येथून भंडारदरा येथे जाण्यासाठी प्रवेश बंद करण्यात आला आहे. शेंडी/भंडारदरा येथे जाण्यासाठी वाकी फाटा, वारंघुशी फाटा येथून प्रवेश असेल.
  • एकेरी वाहतुकीचा मार्ग वारंघुशी फाटा – वाकी फाटा – चिचोंडी फाटा – यश रिसॉर्ट शेंडी, भंडारदरा धरण स्पील्वे गेट – भंडारदरा गाव – गुहिरे रंधा मार्गे इच्छितस्थळी जाता येणार आहे.

मोठया प्रमाणात पर्यटक येण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांनीही नियोजन आणि बंदोबस्ताची तयारी केली आहे. येथे येणाऱ्या पर्यटकांनी नियमांचे पालन करावे, येणाऱ्या वाहनांची तपासणी होणार आहे. मद्यपान करणे किंवा मद्य बाळगणे टाळावे, नियम पाळून पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन राजूर पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण दातरे यांनी केले आहे.

Web Title: Important news for tourists coming to Bhandardara Dam

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here