Home अकोले Nalwande Dam | जायकवाडीला निळवंडे धरणातून विसर्ग वाढवला

Nalwande Dam | जायकवाडीला निळवंडे धरणातून विसर्ग वाढवला

Nalwande Dam: जायकवाडीला निळवंडे धरणातून विसर्ग वाढवला, टप्प्याटप्प्याने विसर्ग वाढविण्यात येणार

Increased discharge from Nilwande Dam to Jayakwadi

अकोले: निळवंडे धरणातून विसर्ग वाढविण्यात आला आहे. दोन हजार क्यूसेकणे विसर्ग वाढविला आहे. टप्प्याटप्प्याने विसर्ग वाढविण्यात येणार आहे.

महाराष्ट्र शासनाच्या आदेशाने जायकवाडी धरणासाठी शुक्रवारी रात्री ११ वाजता निळवंडे धरणातून १०० क्युसेकने पाणी सोडण्यात आले. हे पाणी जायकवाडीच्या दिशेने झेपावले असून ते टप्या-टप्याने वाढविले जाणार आहे. त्यामुळे प्रवरा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

जायकवाडी धरणाला पाणी देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी सुरु झाली आहे. भंडारदरा निळवंडे धरणातून ३.३१ टीएमसी पाणी द्यायचे आहे. शुक्रवारी रात्री शासनाचा आदेश आल्याने रात्री ११ वाजता निळवंडे धरणातून १०० क्युसेकने पाणी प्रवरा पात्रात सोडण्यात आले. शनिवारी रात्री हळूहळू पाण्याचा हे पाणी ६ ते ८ दिवस चालू राहणार आहे. पाणी सोडतेवेळी भंडारदरा धरणात ९ हजार २१० दशलक्ष घनफूट तर निळवंडे धरणात ८ हजार १५१ दशलक्ष घनफूट पाणीसाठा शिल्लक असल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या भंडारदरा शाखेचे अभियंता अभिजित देशमुख यांनी दिली आहे.

जायकवाडी धरणासाठी हे आवर्तन सोडण्यात आले आहे. लाभक्षेत्रातील नागरिकांचा पाणी देण्यास विरोध असतानाही समन्यायी कायद्यामुळे अखेर पाणी सोडण्यात आले आहे. पाणी न देण्यासाठी लाभक्षेत्रातून न्यायालयातही सामाजिक कार्यकर्ते, साखर कारखान्यांनी याचिका दाखल केलेल्या आहेत. जायकवाडीला पाणी सोडावे यासाठी मराठवाडा विभागात आंदोलने झाली आहेत.

भंडारदरा धरणातून आज पाणी सोडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जायकवाडीला नाशिक जिल्ह्यातील काही धरणांतून पाणी सोडले गेले आहे. पावसाळा संपून हिवाळ्याची सुरुवातच होत असून इतक्या लवकर धरणसाठा रिक्त झाला, तर अकोले तालुक्यातील शेतकरी चिंतेत पडल्याचं चित्र सध्या दिसत आहे. पाण्याचे फेरवाटप व्हावे, यासाठी सातत्याने अकोले तालुक्यातील शेतकरी आपल्या मागण्या मांडत आहेत. पाण्याचे नियोजन योग्य पद्धतीने न झाल्यास पुढील कालावधीत अडचणींचा सामना करावा लागणार आहे.

निळवंडे धरणातून विसर्ग वाढविण्यात आला आहे. दोन हजार क्यूसेकणे विसर्ग वाढविला आहे.

Web Title: Increased discharge from Nilwande Dam to Jayakwadi

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here