Home अकोले राजूरमध्ये टवाळखोर, रोडरोमिओ वाढते प्रमाण पोलिसांनी कारवाई करावी, ग्रामस्थांची मागणी

राजूरमध्ये टवाळखोर, रोडरोमिओ वाढते प्रमाण पोलिसांनी कारवाई करावी, ग्रामस्थांची मागणी

राजूरमध्ये टवाळखोर, रोडरोमिओ वाढते प्रमाण पोलिसांनी कारवाई करावी, ग्रामस्थांची मागणी

ललित मुतडक राजूर वार्ताहार:- राजूर शहरामध्ये सध्या तरुण युवक व काही टवाळ,रोडरोमियोगिरी करणाऱ्यांकडून कर्णकर्कश हॉर्न तसेच दुचाकीच्या सायलेंन्सरच्या आवाजाने राजूर शहरातील व्यापारी व नागरिक हैराण झालेले होते.टारगट व नोलिमीटमध्ये दुचाकी चालविणारे स्वार रस्त्यावर गाडी जोरजोरात रेस करून कानठळ्या बसतील असा सायलेन्सरचा व हॉर्नचा कर्णकर्कश आवाज काढतात.या आवाजाने लोकांचे लक्ष विचलित होतेच,बरोबर ध्वनिप्रदूषणही होत आहे.तसेच या वाहनांवर प्रेस व पोलीस नाव व लोगो विनाकारण लावलेले आहेत हे नजरेस आले आहे.यावर देखील विचारणा करून असत्य आढळून आल्यास तर त्यावर योग्य ती कारवाई करावी,अशी मागणी राजूर शहरातील ग्रामस्थ व व्यापारी वर्ग करत आहेत.
         मनाला वाटेल त्याप्रमाणे गाडी रेस करून सार्वजनिक शांतता धोक्यात आणणारे व ध्वनीप्रदूषण वाढविणाऱ्या टवाळखोर,टारगट व रोडरोमियो दुचाकीस्वारांवर पोलिसांकडून कुठलीही कारवाई होत नसल्याने या गाड्यांचा व गाडी मालकांचा आवाज दिवसेंदिवस वाढत असून रात्रंदिवस रस्त्यावर गल्लीबोळात घुमत आहे. आपले कोणीच काही करू शकत नाही, आपल्यावर कारवाई होऊ शकत नाही,या अविर्भावात हे टवाळखोर,रोडरोमिओ शहरात फिरत आहेत.बुलेटच्या सायलेन्सरचा आवाज जोरदार वाढवत हे युवक पोलिसांसमोरच दररोज ये-जा करत असतानाही त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई होत नसल्याने नागरिकांमधून याबाबतच्या आश्चर्यजनक प्रतिक्रिया व भावना व्यक्त केल्या जात आहे.त्या गाड्यांच्या ध्वनिप्रदूषणाने विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर,आजारी रुग्णांवर देखील विपरीत परिणाम राजुर नगरीत होत आहे.ज्येष्ठ नागरिक लहान मुले व वाहनचालक रस्त्यावरून ये-जा करताना या कर्णकर्कश आवाजाने गोंधळून जातात.या टवाळखोर,रोडरोमिओ युवकांवर तातडीने पोलिसांनी कारवाई करावी,अशी मागणी राजुर परिसरातील बसस्थानक परिसरातील व्यापारी वर्गातुन,नागरिकांमधून होत आहे.यातील अनेक टपोरीगिरी रोडरोमियोगिरी करणारे युवक शाळा,कॉलेज,क्लासेस सुटण्याच्या वेळी रस्त्यावरून फिरत असतात.महाविद्यालयीन व शालेय युवतींच्या जवळून जाताना दुचाकी रेस करुन हॉर्नचा,सायलेन्सरचा आवाज जाणून-बुजून वाढवतात.आपण कोणीतरी वेगळेच असल्याचे भासवून देण्याचा प्रयत्न या अशा पद्धतीच्या माध्यमातून या गावगुंड लोकांकडून केला जात आहे.या गावगुंड व्यक्तींच्या विरोध मोठी कारवाई करण्यात आली पाहिजे,वेगळेच चाळे करणारे रोडरोमियोगिरी करणाऱ्या दुचाकीस्वार आवाज वाढवून नागरिकांचे मानसिक स्वास्थ्य खराब करत आहेत.त्यांच्यावर कारवाई होत नसल्याने त्यांच्यावर कायद्याचा वचक निर्माण होत नाही.विशेषतः बुलेटसह इतर दुचाक्यांच्या या कंपनीचे ओरिजनल सायलेन्सर बदलून त्याऐवजी मोठ्या व अँटिक आवाजाची फायरिंग करणारे सायलेन्सर बसवले जात आहे.राजुर पोलीस हेल्मेट सुद्धा सक्तीचे करत नाही.याकडे का लक्ष दिले जात नाही.महाविद्यालय शाळा दवाखाने यांच्या जवळून जाताना आवाज व कर्णकर्कश हॉर्न वाजवण्याचे प्रकार सातत्याने वाढत आहे.याचा परिणाम शासकीय,शालेय,कामकाजावर सुद्धा मोठ्या प्रमाणात होत आहे.अनेक दुचाकीस्वरांकडे ड्रायव्हिंग लायसन्स नसतानाही ते बिनधास्तपणे मोटरसायकल व कार चालवतात.या कर्णकर्कश आवाज करणाऱ्या दुचाकीस्वारांना सांगण्यासाठी माघे काही दिवसांपूर्वी पत्रकार मित्र गेले असता त्यांना देखील या रोडरोमियोनी कुठल्याही प्रकारची दाद दिली नाही.त्यांच्या विरोधात भारतीय दंडात्मक कायद्यान्वये कारवाई करून त्यांच्यावर कायद्याचा धाक बसविणे काळाची गरज आहे.अन्यथा धोनी प्रदूषणाबरोबरच इतरही गैरप्रकार वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.गेल्या काही दिवसांपूर्वी राजूर शहरामध्ये छेडछाडीचे प्रकार देखील होऊन गेले आहे.तर यावर कोणीही कुठल्याही प्रकारची कारवाई केलेली नाही.असे न झाल्यास यावर जनआंदोलन करण्यात येणार असल्याचे देखील ग्रामस्थांनी इशारा दिला आहे.

Website Title: Increasing tamper and roadromiyo in Rajur


Latest: Sangamner NewsAkole News, And Entertainment News


अहमदनगर जिल्ह्यातील No-1 अप्प: आजच Google Play Store ला जाऊन डाउनलोड करा – Sangamner Akole News.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here