Home अहमदनगर Ahmednagar: अहमदनगर जिल्ह्यात बर्ड फ्लूचा शिरकाव

Ahmednagar: अहमदनगर जिल्ह्यात बर्ड फ्लूचा शिरकाव

nflux of bird flu in Ahmednagar

अहमदनगर | Ahmednagar: महाराष्ट्र राज्यात अनेक ठिकाणी बर्ड फ्लूने थैमान घातलेले आहे. तसेच नगर जिल्ह्यातही बर्ड फ्लूचा शिरकाव झाला आहे.

गेल्या दोन दिवसांत नगर तालुक्यातील आठवड व निंबळक १६२ कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी निंबळक येथे ४६ तर आठवड येथे ११६ कोंबड्या मृत्यूमुखी पडल्या आहेत. या ठिकाणी नगर तालुका पंचायत समिती पशुसंवर्धन विभाग पथकाने भेट दिली आहे. यातील पक्षांचे नमुने पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सुनील तुंबारे यांनी दिली आहे.

बाराबाभळी येथे साळुंकी मृत अवस्थेत आढळून आली. तिचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने गावात पोल्ट्रीफार्मचे निर्जंतुकीकरण करण्याचे काम सुरु आहे.

अहमदनगर शहराजवळ असणाऱ्या पाच किलोमीटर अंतरावर निंबळक येथे राम चव्हाण यांच्या मालकीच्या ४६ कोंबड्या मृत्यू पावल्या. यातील पाच कोंबड्या तपासणीसाठी पुणे येथे पाठविण्यात आल्या आहेत. त्यांचा अहवाल अद्याप येणे बाकी आहे.

Web Title: Influx of bird flu in Ahmednagar

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here