Home संगमनेर संगमनेर: घरातून हजारोंचा ऐवज लंपास

संगमनेर: घरातून हजारोंचा ऐवज लंपास

Breaking News | Sangamner theft: अज्ञात चोरट्याने अर्धवट ढकललेल्या घराच्या दरवाजातून आत प्रवेश करीत सोन्या चांदीच्या दागिन्यासह ७१ हजार रुपयांचा ऐवज लंपास.

Instead of spending thousands from home

संगमनेर : तालुक्यातील देवकौठे येथे रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने अर्धवट ढकललेल्या घराच्या दरवाजातून आत प्रवेश करीत सोन्या चांदीच्या दागिन्यासह ७१ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. बुधवारी (दि. ५) रात्री ही घटना घडली. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस सूत्रांनी सांगितले, की देवकौठे येथे बाबासाहेब पाराजी कहांडळ (वय ४७) हे राहतात. घरातील व्यक्ती झोपलेल्या असताना अज्ञात चोरट्याने घराच्या अर्धवट ढकललेल्या दरवाजातून घरात प्रवेश करुन लॉक नसलेल्या कपाटाचे दरवाजे उघडले. सोन्याचे दागिने व स्टीलचे डब्यातून तसेच बॅगधुन रोख रक्कम लंपास केली.

सकाळी बाबासाहेब कहांडळ हे झोपेतून उठल्यावर चोरीचा हार प्रकार लक्षात आला. सोन्याची नथ, सोन्याचे मणी, दोन वाट्या, झुबे, सोन्याच्या रिंगा, अंगठी, रोख रक्कम, एक मोबाइल, असा मिळून एकूण ७१ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. बाबासाहेब पाराजी कहांडळ यांनी पोलिसांत चोरीची फिर्याद दिली. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल एम. आर. सहाणे अधिक तपास करीत आहेत. चोरीच्या या घटनेने परिसरात भीतीदायक वातावरण पसरले आहे.

Web Title: Instead of spending thousands from home

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here