Home क्राईम किराणा दुकानातून चक्क दारूची विक्री, पती पत्नीचा प्रताप

किराणा दुकानातून चक्क दारूची विक्री, पती पत्नीचा प्रताप

Jalana sale of Chucky liquor from the grocery store

जालना: अंबड तालुक्यातील घुंगर्डे हदगाव येथील पती पत्नीचा प्रताप समोर आला आहे. चक्क किराणा दुकानातूनच देशी दारूची विक्री होत असल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी पती पत्नी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घुंगर्डे हदगाव येथील भगवान सांगडे वा त्यांची पत्नी हे त्यांच्या किराणा दुकानातून विना परवाना बेकायदेशीरपणे देशी दारू विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानुसार पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन धाड टाकली असता दुकानातून १ हजार ४० रुपये किमतीच्या २० बाटल्या ताब्यात घेण्यात आल्या. यामुळे पती पत्नीचे कार्यक्रम उघडकीस आला आहे.

याप्रकरणी अविनाश पगारे यांच्या फिर्यादीवरून पती पत्नी विरोधात गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Jalana sale of Chucky liquor from the grocery store

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here