Home अहमदनगर सासरच्या त्रासाला कंटाळून नवविवाहितेची आत्महत्या, गुन्हा दाखल  

सासरच्या त्रासाला कंटाळून नवविवाहितेची आत्महत्या, गुन्हा दाखल  

Jamkhed commit suicide due to father-in-law's troubles

जामखेड | Jamkhed: शेती घेण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये घेऊन यावेत यासाठी सासरच्यांनी मानसिक व शारीरिक त्रास दिल्याने या जाचास कंटाळून नवविवाहितेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी जामखेड तालुक्यात घडली आहे.

या प्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करण्यावरून सासरच्या तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत विवाहित महिलेच्या पतीस पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जामखेड तालुक्यातील सटवाई जवळके येथे राहत असणारी राधा खोसे वय १९ असे या विवाहित मयत तरुणीचे नाव आहे. या मयत तरुणीचे तीन महिन्यांपूर्वी लग्न झाले होते. लग्न झाल्यानंतर सासरच्या मंडळीनी नवीन शेती  विकत घेण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणण्याचा तगादा लावला होता. माहेरची परिस्थिती नसल्याने त्यांनी पैसे देण्यास असमर्थता दाखविल्याने तिला शारीरिक व मानसिक त्रास दिला जात होता. उपाशीपोटी ठेवण्यात येत होते. मारहाण व शिवीगाळ करण्यात येत होती. माहेरच्याशी फोनवर बोलू दिले जात नव्हते. या त्रासातून कंटाळून शनिवारी सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास शेतातील विहिरीत उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपविली.

मयताचे वडील अंगद सुरवस यांनी  जामखेड पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती, सासू, सासरा या तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पती भरत हनुमंत खोसे, सासरा हनुमंत लक्षमण खोसे, सासू महानंदा हनुमंत खोसे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.  पती भरत हनुमंत खोसे यास अटक करण्यात आली आहे.

महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळावा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.

See:  Latest Entertainment News, Latest Ahmednagar News in Marathi, and  Latest Marathi News

Web Title: Jamkhed commit suicide due to father-in-law’s troubles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here