Home Suicide News मुलगी झाल्याने सासरच्यांकडून छळ, तीन मुलींसह आईची आत्महत्या

मुलगी झाल्याने सासरच्यांकडून छळ, तीन मुलींसह आईची आत्महत्या

Jamkhed Mother-in-law commits suicide with three daughters

जामखेड | Jamkhed: तिसरी मुलगी झाल्याने सासरच्या लोकांकडून सातत्याने होणाऱ्या छळाला कंटाळून कुसडगाव ता. जामखेड येथील महिलेने तीन मुलींसहीत विहिरीत उडी मारून आत्महत्या केली अशी फिर्याद महिलेच्या आईने जामखेड पोलिसांत दिली आहे. याप्रकरणी महिलेचा पती, सासू सासरे, यांच्याविरोधात आत्महत्या प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे,

रविवारी सायंकाळी कुसडगाव येथील शेत्तातील विहिरीत स्वाती कार्ले व तिच्या मुलगी अंजली, सायली, कोमल यांचा मृतदेह आढळून आला होता. रात्री ग्रामीण रुग्णालयात मृतदेह नेण्यात आले होते. मात्र माहेरच्यांनी आम्ही आल्याशिवाय शवविचेदन करू नये असे सांगितले होते. सोमवारी शवविचेदन करण्यात आले.

सोमवारी मयत स्वाती कार्ले यांची आई शोभा वाल्मिक वाघ हल्ली रा. गुजरात यांनी जामखेड पोलिसांत फिर्याद दिली आहे. स्वाती यांचा विवाह २००७ साली राम दिनकर कार्ले यांच्याबरोबर झाला होता. तिला तीन मुली होत्या. तिसरी मुलगी झाल्यापासून तिचा पती राम दिनकर कार्ले, सासरे दिनकर पर्बती कार्ले सासू शिलावती कार्ले हे तिला उपाशी ठेवत होते. तिचा मानसिक व शारीरिक छळ करीत होते.  

वाचकहो, ‘संगमनेर अकोले न्यूज’ ला व्हाटस अप वर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केले नसेल तर क्लिक करा -(Sangamner Akole News) आणि मिळवा ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलवर.  

Website Title: Jamkhed Mother-in-law commits suicide with three daughters

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here