Home अहमदनगर Murder | खुनाच्या घटनेने जामखेड तालुका हादरला

Murder | खुनाच्या घटनेने जामखेड तालुका हादरला

Jamkhed taluka was shaken by the murder

Ahmednagar | जामखेड । Jamkhed: जामखेड तालुक्यातील खर्डा येथील सुर्वे वस्तीवरील एका तरुणाची हत्या (Murder) करण्यात आल्याची घटना शनिवारी समोर आली. या घटनेने खर्डासह जामखेड तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.

विशाल ईश्वर सुर्वे (वय ३२ ) असे खुन झालेल्या तरुणाचे नाव आहे. खुनाच्या घटनेमुळे खर्डा परिसरासह जामखेड तालुक्याला हादरा बसला आहे.

पोलिसांकडून ,मिळालेली माहिती अशी की, जामखेड तालुक्यातील खर्डा येथील विशाल ईश्वर सुर्वे हा युवक आपल्या मालकीच्या एम एच १६ सीडी १२१९ या जितो कंपनीचा छोटा टेम्पो घेऊन खर्डा शहरानजीक सुर्वेवस्तीकडे जात असताना अज्ञात इसमांनी त्याचा टॅम्पो अडवून अज्ञात कारणावरून कुठल्यातरी टणक हत्याराने विशाल याच्या डोक्याच्या डाव्या बाजूला जबर मारहाण केली.

या मारहाणीत विशाल सुर्वेचा जागेवर मृत्यू (Death) झाला यावेळी हल्लेखोरांनी मयत विशाल सुर्वे याच्याकडील रोख रक्कम व मोबाईल फोन असा एकुण दोन हजार आठशे रुपयांचा ऐवज घेऊन पोबारा झाले ही घटना शुक्रवारी रात्री ११.३० वाजता घडली. या प्रकरणी अज्ञात आरोपींविरुध्द कलम ३०२, ३९४ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मयताचा भाऊ सुशेन ईश्वर सुर्वे (वय २३) याने जामखेड पोलिस स्टेशनला शनिवारी फिर्याद दाखल केली आहे. विशाल सुर्वे या तरूणाचा खून कोणत्या कारणामुळे झाला? याचा जामखेड गुन्हे शोध पथक वेगाने तपास करत आहे.

Web Title: Jamkhed taluka was shaken by the murder

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here