Home औरंगाबाद प्रेमात अडसर ठरणाऱ्या मुलाचा जवानाने काढला काटा

प्रेमात अडसर ठरणाऱ्या मुलाचा जवानाने काढला काटा

Obstacle in love: केबलने केली मारहाण,  दोन महिन्यांच्या उपचारानंतर मुलाचा मृत्यू .

jawan removes a thorn from a boy who is an obstacle in love

औरंगाबाद : लष्करातील जवानाने प्रेमात अडसर ठरणाऱ्या प्रेयसीच्या मुलाचा केबल वायरने मारून खून केल्याची घटना उघडकीस आली. गंभीर जखमी ११ वर्षांच्या मुलाचे खासगी रुग्णालयात तब्बल दोन महिने उपचार सुरू असताना शनिवारी निधन झाले. या प्रकरणी लष्करी जवानाच्या विरोधात पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.

गणेश बबन  थोरात (रा.सिंदखेडराजा, जि. बुलडाणा) असे आरोपी जवानाचे नाव आहे.  मृत मुलाच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार, तिच्या पतीवर खासगी रुग्णालयात कोरोनाचे उपचार सुरू असताना गणेशची ओळख दवाखान्यात झाली होती. महिला व गणेश एकमेकांचे नातेवाईक निघाले. तेव्हा गणेश औरंगाबादेतील लष्करी छावणीत कार्यरत होता. महिलेच्या पतीला किडनीच्या आजारावरील उपचारासाठी आई-वडिलांनी इंदूरला नेले. तेव्हापासून महिला ११ वर्षांच्या मुलासोबत गारखेडा परिसरात राहत होती. स्वत:ही आधीच विवाहित असताना गणेशने या विवाहितेसोबत प्रेमसंबंध निर्माण केले. दोन वर्षांपूर्वी दिवाळीच्या दिवशी फुलांची माळ महिलेच्या गळ्यात घालत कपाळावर केसात कुंकू लावले. तेव्हापासून ते दोघे पती-पत्नीसारखे राहू लागले. जानेवारी २०२२ मध्ये त्याची बदली जम्मू काश्मीरमध्ये झाली. त्यानंतरही तो फोनद्वारे संपर्कात होता. गावाकडे आल्यावर घरी येऊन राहत होता. ३० जून रोजी गणेशने महिलेच्या मुलास केबलच्या वायरने मारहाण केली. यात गंभीर जखमी झालेल्या मुलास खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, २७ ऑगस्ट रोजी त्याची प्राणज्योत मालवली.

नोकरी जाण्याची भीती

गणेशने नोकरी जाण्याच्या भीतीमुळे महिलेला पोलिसांकडे चुकीचा जबाब देण्यास भाग पाडले. तसेच सिंदखेडराजा येथे (पहिल्या पत्नीसोबत वाद झाल्यामुळे रागाच्या भरात आपल्या प्रेमात अडसर ठरल्यामुळे मुलाला मारहाण केल्याचेही गणेशने सांगितले. मुलाचा जीव गेल्यामुळे शेवटी महिलेने जवानाच्या विरोधात पोलिसांत तक्रार नोंदवली.

Web Title: jawan removes a thorn from a boy who is an obstacle in love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here