Home क्राईम संगमनेर: बसमधून प्रवासादरम्यान माय-लेकीचे दागिने चोरीला

संगमनेर: बसमधून प्रवासादरम्यान माय-लेकीचे दागिने चोरीला

Sangamner Theft:  महामंडळाच्या बसमधून प्रवास करत असताना माय-लेकीचे दागिने चोरीला.

jewelry was theft during  bus ride in Sangamner

संगमनेर: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसमधून प्रवास करत असताना माय-लेकीचे दागिने चोरीला गेल्याची घटना रविवारी (दि. १८) दुपारी ४. ५० ते संध्याकाळी ६. १५ दरम्यान लोणी-संगमनेर प्रवासादरम्यान घडली. लोणी येथील ४६ वर्षीय महिलेने संगमनेर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून  दिलेल्या फिर्यादीवरून सोमवारी (दि.१९) संगमनेर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, लोणी येथून संगमनेरात येण्यासाठी ४६ वर्षीय महिला आणि त्यांची मुलगी या परिवहन महामंडळाच्या बसमध्ये (एम. एच. ४०. ए. क्यू. ६३१७) बसल्या. प्रवासादरम्यान या माय- लेकीचे दागिने चोरीला गेले. नंतर त्यांच्या हा प्रकार लक्षात आला. ८० हजार रुपये किमतीचे चार तोळ्यांचे मंगळसूत्र, ३० हजार रुपये किमतीचे दहा ग्रॅमचे पेडंट, १० हजार रुपये किमतीचे तीन ग्रॅमचे कानातले असा एकूण १ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. संगमनेर शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक बी. के. धिंदळे पुढील तपास करत आहेत.

Web Title: jewelry was theft during  bus ride in Sangamner

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here