Home महाराष्ट्र काकासाहेब शिंदे यांचा दशक्रिया विधी : पोलीस बंदोबस्त तैनात

काकासाहेब शिंदे यांचा दशक्रिया विधी : पोलीस बंदोबस्त तैनात

नेवासा : काकासाहेब शिंदे यांचा बुधवार दि.१आॅगस्ट रोजी कायगाव टोका येथे दशक्रिया विधी होणार आहे. मराठा आरक्षण आंदोलनामध्ये काकासाहेब शिंदे यांनी जलसमाधी घेतलेली आहे. या दशक्रिया विधीसाठी मराठा बांधव मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याची शक्यता असल्याने होणारी वाहतूक कोंडी आणि कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने खबरदारी म्हणून औरंगाबाद – पुणे या महामार्गावरील वाहतूक पैठण, शेवगांव मार्गे वळवण्याचा निर्णय औरंगाबाद ग्रामीणचे पोलिस अधीक्षकांनी घेतला आहे.

You May Also Like:Shahid Kapoor wife age | Mira Rajput

१ आॅगस्ट रोजी अहमदनगर येथून औरंगाबादकडे येणा-या वाहन धारकांनी पांढरीपूल- शेवगाव-पैठण -बिडकीन- औरंगाबाद मार्गाने वाहतूक वळविण्यात आली आहे. सर्व वाहन धारकांनी दिलेल्या पर्यायी मार्गाचा वापर करावा व वाहतूक कोंडी टाळावी. कोणालाही त्रास होऊ नये यासाठी पर्यायी मार्गाचा अवलंब करून पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन औरंगाबाद ग्रामीण पोलीस अधिक्षकांनी केले आहे.

You May Also LikeSonam Kapoor age | Sonam Kapoor Biography

गोदावरी नदी वरील जुन्या व नवीन पुलावर दक्षिणेकडे औरंगाबाद पोलिसांनी तर उत्तरेकडे नेवासा पोलिसांनी सोमवारी रात्री पासूनच मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. यामध्ये नेवासा हद्दीत तीन अधिकारी व ५० पोलीस कर्मचारी तर नेवासा फाटा येथे एक अधिकारी व १० कर्मचारी तैनात करण्यात आले असल्याची माहिती नेवासा पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक शरद गोर्डे यांनी दिली. नेवासा बस आगाराच्या औरंगाबादकडे जाणा-या सर्व बस १ आॅगस्ट रोजी बंद ठेवणार असल्याचे स्थानक प्रमुख रमेश सोनवणे यांनी सांगितले.

Fashion Ad

आमच्या संगमनेर अकोले न्यूजच्या व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. रहा अपडेट दररोज. धन्यवाद. संगमनेर अकोले न्यूज–येथे क्लिक करा.


ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा. आपल्याला ही बातमी आवडल्यास फेसबुक वर जरूर शेअर करा धन्यवाद.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here