Home महाराष्ट्र Kangana Ranuat: कंगना रानौतला कोरोनाची लागण

Kangana Ranuat: कंगना रानौतला कोरोनाची लागण

Kangana Ranuat Corona Positive

Kangana Ranuat: देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर केला आहे. देशात सातत्याने बाधितांचा आकडा वाढत आहे. आता  पंगा क्वीन अभिनेत्री कंगना रानौतला कोरोनाची लागण झाली आहे. ती कोरोनाच्या विळख्यात अडकली आहे.

कंगनाने स्वतः सोशियल मेडीयाची माध्यमातून आपल्या चाहत्यांना माहिती दिली आहे. तिने स्वतःला विलगीकरण केले असून सध्या ती डॉक्टरांच्या सल्ल्याने घरातच उपचार घेत आहे. तिने ही माहिती इन्स्टाग्राम अकाऊंट वरून शेअर केली आहे. तिने आपल्या पोस्ट मध्ये लिहिले आहे की, मागील काही दिवसांपासून मला खूप थकवा आला होता आणि माझे डोळे देखील जळजळत होते. हिमाचलला जाण्यापूर्वी मी काल माझी कोरोना टेस्ट करून घेतली होती आणि आज त्याचा अहवाल प्राप्त झाला असून तो कोरोना पॉझिटिव्ह आहे.. मी काही वेळातच स्वतः ला क्वारंटाईन केले आहे. हा विषाणू माझ्या शरीरात आहे, हे मला काहीच माहिती नव्हते. आता मला माहित आहे की, मी यातून लवकरच पूर्णपणे बरी होईन.त्याचबरोबर एक ध्यान धारणा करीत असलेला फोटो शेअर केला आहे.

Web Title: Kangana Ranuat Corona Positive

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here