Accident: ऊसाच्या ट्रेलरखाली दबून महिलेचा मृत्यू
Ahmednagar News Live | Karjat Accident | कर्जत: ऊसाने भरलेला ट्रॅक्टर ट्रेलर पलटी झाल्याने महिलेचा अंगावर पडल्याने दबून महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना कर्जत तालुक्यातील खेडनजीकच्या पुलालगत घडली. या अपघातात शिला अजिनाथ चव्हाण रा. खेड असे मृत महिलेचे नाव आहे.
भीमा नदीच्या पुलालगत ही घटना घडली. पुलानजीक मासे विक्री करणारी दुकाने आहेत. रस्त्यालगत मासे विक्री करणाऱ्या महिलेच्या अंगावर ट्रेलर कोसळले आणि काही वेळानंतर ट्रेलर बाजूला काढण्यात आला. त्यानंतर महिलेला भिंगवन येथे उपचारासाठी हलविण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच महिलेस डॉक्टरांनी मृत घोषित केले. मृतदेह शवविचेदन करण्यासाटी कर्जतच्या उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला.
Web Title: Karjat Accident Woman dies after being crushed under sugarcane trailer