बेपत्ता असलेल्या चार वर्षीय मुलाचा मृतदेह विहिरीत आढळला
कर्जत | Karjat: कर्जत शहरालगत खानवटे वस्ती येथील चार वर्षीय मुलगा शुक्रवारपासून बेपत्ता होता. बेपत्ता असल्याची खबर त्यांचे वडील राजेंद्र खानवटे यांनी कर्जत पोलीस ठाण्यात दिली होती. रविवारी सकाळी त्याचा मृतदेह घराजवळील विहिरीत आढळून आला आहे.
माउली राजेंद्र खानवटे वय ४ असे मयत मुलाचे नाव आहे. खानवटे वस्ती परिसरात उसाचे मोठ्या प्रमाणात क्षेत्र आहे. एखाद्या जंगली प्राण्याने मुलाला उचलले की काय अशी शंका व्यक्त होत होती. याचा विचार करत पोलीस मुलाचा शोध घेत होती.
उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव, पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी सर्व परिसर पिंजून काढला. पथकाला पाचारण करण्यात आले. मात्र त्यांना कोठेही आढळून आला नाही. तेथील नागरिकांनी सर्वच ठिकाणी पाहणी केली मात्र तो कोठेही दिसून आला नाही.
रविवारी सकाळी अखेर त्याचा मृतदेह घराजवळच्या विहिरीत आढळून आला. अधिक तपास सहायक प्पोलीस निरीक्षक सुरेश माने हे करीत आहेत.
महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळावा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.
See: Latest Entertainment News, Latest Ahmednagar News in Marathi, and Latest Marathi News
Web Title: Karjat body of a missing four-year-old boy was found in a well