Home कर्जत अवैध वाळू उपसा करणाऱ्या लाखोंच्या बोटी जप्त, गुन्हा दाखल

अवैध वाळू उपसा करणाऱ्या लाखोंच्या बोटी जप्त, गुन्हा दाखल

Karjat illegal sand dredgers seized

कर्जत | Karjat: तालुक्यातील सिद्धटेक शिवारात अवैध वाळू उपसा करणाऱ्यावर पोलिसांनी धडक कारवाई मोहीम हाती घेतली आहे. पोलीस उपाधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या पथकाने गुरुवारी कारवाई करत साडे तेरा लाख रुपयांच्या यांत्रिक बोटी जप्त करण्यात आल्या आहेत.

जिल्ह्यामध्ये वाळू साठा लिलाव कोठेही झालेला नाही. तरीसुद्धा अवैध वाळू उपसा सुरु आहे. अवैध वाळू उपसा तस्करांची माहिती प्रशासन घेत आहेत. सिद्धटेक शिवारातील भीमानदी पात्रात अवैध वाळू उपसा बोटींच्या सहायाने चालू असल्याची माहिती कर्जतचे पोलीस उपाधीक्षक अण्णासाहेब जाधव यांना मिळाली. त्यांनी श्रीगोंदा व कर्जत येथील पोलीस पथक घेऊन भीमा नदीपात्रात कारवाई करण्याची मोहीम राबविली. पोलीस पथकाने भीमा नदीपात्रात उतरवून अवैध वाळू उपसा यांत्रिक बोटी जप्त करण्यात आल्या.

यामध्ये एकूण १३ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच पो.ना. अप्पासाहेब कोळेकर यांच्या फिर्यादीवरून कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. आता पोलीस इंजिन मालक यांचा शोध घेत आहेत. अधिक तपास सोमनाथ दिवटे करीत आहेत.

Web Title: Karjat illegal sand dredgers seized

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here