Home अहमदनगर Karjat Nagar Panchayat Election Result:  कर्जत नगर पंचायत निकाल

Karjat Nagar Panchayat Election Result:  कर्जत नगर पंचायत निकाल

Karjat Nagar Panchayat Election Result

कर्जत | Karjat: Karjat Nagar Panchayat Election Result:  कर्जत नगरपंचायतीसाठी सुरू असलेली मतमोजणी पुर्ण होत आली असून आतापर्यतच्या निकालानुसार राष्ट्रवादी, कॉग्रेस व मित्रपक्षांनी एकुण 17 पैकी 15 जागांवर विजय मिळवला आहे. तर भाजपला अवघ्या दोन जागांवर समाधान मानावे लागले आहे.

आ. रोहित पवार व माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांच्या प्रतिष्ठेची झालेल्या या निवडणुकीत रोहित पवार यांनी बाजी मारली आहे. भाजपच्या ताब्यातील नगरपंचायत पवार यांनी हिसकावून घेतल्याची यामुळे चर्चा रंगली आहे.

निवडणुक निकालासाठी सकाळपासून राष्ट्रवादी व भाजपच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. जसजसे निकाल जाहिर होत गेले तसे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष वाढत गेला. ढोल ताशे, तसेच गुलालाची उधळण करत हा जल्लोष सुरू होता.

Web  Title: Karjat Nagar Panchayat Election Result

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here