Home अहमदनगर अल्पवयीन मुलीला घरातून नेले पळवून, अपहरणाचा गुन्हा

अल्पवयीन मुलीला घरातून नेले पळवून, अपहरणाचा गुन्हा

Kidnap of a minor girl from home

राहुरी | Kidnap Crime:  राहुरी तालुक्यात अपहरणाची घटना समोर आली आहे. सद्यस्थितीत ही तिसरी घटना आहे. दरडगाव थडी येथील अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वडिलानी दिलेल्या फिर्यादीनुसार,  दिनांक २५ नोव्हेंबर रोजी रात्री सदर १७ वर्षे ४ महिने वय असलेली अल्पवयीन मुलगी तिच्या राहत्या घरात झोपली होती. मध्यरात्री त्या मुलीच्या आईला जाग आली. तेव्हा मुलगी जागेवर नसल्याचे दिसून आले. सदर मुलगी घरातून बेपत्ता झाल्याचे लक्षात आले. घरातील लोकांनी त्या मुलीचा परिसरात शोध घेतला. मात्र ती मिळून आली नाही.

कोणीतरी त्यांच्या मुलीचे अपहरण करून पळवून नेल्याची त्यांची खात्री झाली. त्यानंतर त्यांनी राहुरी पोलिसांत धाव घेत फिर्याद दाखल केली आहे. या  फिर्यादीवरून अज्ञात इसमा विरुध्द अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. अधिक तपास पोलिस निरीक्षक राजेंद्र इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Web Title: Kidnap of a minor girl from home

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here