Home अहमदनगर अपहरण झालेल्या तरुणाची सुटका, पाच जणांना अटक

अपहरण झालेल्या तरुणाची सुटका, पाच जणांना अटक

Kidnapped youth released, five arrested

कोपरगाव | Kidnapped: कोपरगाव बसस्थानक येथून १५ जुलै रोजी दुपारी साडे तीन वाजेच्या सुमारास एका तरुणाचे कारमधून अज्ञात व्यक्तींनी अपहरण केले होते. याप्रकरणी शहर पोलिसांनी पुणे जिल्ह्यातून पाच आरोपींना अटक केली असून दोन महिलांचा देखील समावेश आहे. तसेच ६ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

प्रमिला पवार या महिलेच्या सांगण्यावरून ५ लाख रुपयांच्या मागणीसाठी मनमाडच्या स्वामी जनार्दन नगर येथील सचिन वसंत जाधव वय ३५ या तरुणाचे कोपरगाव शहर बस स्थानक येथून १५ जुलै रोजी दुपारी पांढऱ्या रंगाच्या इरटिगा कारमधून आलेल्या अज्ञात तिघे व एक अज्ञात महिला यानी अपहरण केले होते.

अपहरण झालेल्या तरुणाची पत्नी भावना जाधव यांनी शहर पोलिसांत फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला होता. शिर्डीचे उप विभागीय पोलीस अधिकारी संजय सातव व पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक गोष्टींच्या आधारे पुणे जिल्ह्यातील आळे फाटा येथील एका घरात डांबून ठेवलेल्या अपहरण ग्रस्त तरुणाची सुटका केली. एकनाथ हरिभाऊ हाडवळे वय ५४ रा. राजुरी ता. जुन्नर, भाऊसाहेब विठ्ठल काळे रा. आळे फाटा, प्रवीण राबाजी खेमनर वय २८ रा. अंभोरे ता. संगमनेर, प्रमिला महेश पवार रा. नाशिक, सीमा भाऊसाहेब काळे रा. आळेफाटा यांना ताब्यात घेतले तसेच कार व मोबाईल असा ६ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Web Title: Kidnapped youth released, five arrested

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here