Home जळगाव अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार

अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार

Kidnapping and sexually abuse a minor girl Jalgaon

यावल | जळगाव: यावल तालुक्यातील एका गावातील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन तिच्यावर लैंगिक अत्याचार (Sexual Abuse) केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी संशयित तरुणासह त्यास मदत करणाऱ्या अन्य तीन जणांसह चार संशयितांविरुद्ध येथील पोलिसात पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यावल तालुक्यातील एका गावातील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण त्याच गावातील संशयित चंद्रकांत उर्फ भूषण आत्माराम सोनवणे (कोळी) याने २७ एप्रिलला केले. चंद्रकांतने महेंद्र कोळी (रा. आसोदा, ता. जळगाव) याचे मदतीने अल्पवयीन मुलीचे अपहरण केले. संशयित चंद्रकांत त्या अल्पवयीन मुलीस नाशिक येथील नातेवाईक जितेंद्र कोळी व दीपाली जितेंद्र कोळी यांचे घरी घेऊन गेला. त्या ठिकाणी सलग चार दिवस मुलीवर लैंगिक अत्याचार (Sexual Abuse) केला.

पिडीत अल्पवयीन मुलगी रविवारी (ता.१) घरी परतल्यावर तिने घडलेली घटना कुटुंबियांना कथन केली. यापूर्वीच येथील पोलिस ठाण्यात संबंधित मुलीच्या अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता. संशयित चंद्रकांत उर्फ भूषण सोनवणे (कोळी) यास अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्यात इतर तीन संशयितांचा समावेश करण्यात येऊन त्यांचा शोध पोलीस पथक घेत आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक आयपीएस अधिकारी आशीत कांबळे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सुनिता कोळपकर, सहाय्यक फौजदार अजीज शेख, हवालदार नरेंद्र बागुले हे करीत आहेत.

Web Title: Kidnapping and sexually abuse a minor girl

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here