Ahmednagar | अहमदनगर अल्पवयीन मुलीचे अपहरण
Ahmednagar Latest Marathi News Today: Kidnapping | Suicide Case.
नगर | केडगाव उपनगरातून अल्पवयीन मुलीचे (वय १७) अपहरण झाल्याची घटना शनिवारी घडली. अल्पवयीन मुलीच्या आजीने दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन मुलगी शनिवारी दुपारी साडेबारा वाजता घरात कोणास काही न सांगता निघून गेली आहे. कोणीतरी व्यक्तीने तिचे अपहरण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
गळफास घेऊन युवकाची आत्महत्या
नगर । भाड्याने राहत असलेल्या घरात गळफास घेऊन तरूणाने आत्महत्या केली. रामदास रभाजी मुखेकर (वय ३०, मूळ रा. कोरडगाव, ता. पाथर्डी) असे या तरूणाचे नाव आहे. या प्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. बालिकाश्रम रस्त्यावरील बोरूडे मळा येथे शनिवारी (दि. २०) रात्री १० वाजता ही घटना घडली. पोलिस नाईक संतोष गर्जे अधिक तपास करीत आहेत.
चिचोंडी पाटील येथे मुलाची आत्महत्या
नगर । चिचोंडी पाटील (ता. नगर) येथे रविवारी सकाळी एका अल्पवयीन मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली. तेजस बाळासाहेब कोकाटे ( वय १४) असे या मुलाचे नाव आहे. तेजसने आत्महत्या का केली, याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. तेजसने गळफास घेतल्याची माहिती कुटुंबीयाना मिळताच त्यांनी त्याला उपचारासाठी जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी नगर तालुका पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
Web Title: Kidnapping of Ahmednagar minor girl