Home अहमदनगर Suicide: शेतकर्‍याची कर्जाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या

Suicide: शेतकर्‍याची कर्जाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या

Kopargaon Farmer commits suicide by choking on debt

Kopargaon | कोपरगाव: कोपरगाव तालुक्यातील बहादरपूर येथील 37 वर्षीय तरुण शेतकर्‍यांनी कर्जाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची घटना घडली आहे. काकासाहेब छबू रहाणे असे या मयत शेतकर्‍याचे नाव आहे. मंगळवारी दुपारी ही घटना घडली.

मंगळवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास पत्नी शेतात होती तर मुले शाळेत गेली होती. काकासाहेब यांनी गाईच्या गोठ्यालगत असलेल्या घरात छताला दोरीच्या सहाय्याने फाशी घेतली.

मुले शाळेतून घरी आल्यावर ही बाब उघडकीस आली. त्यांनी आवाज दिल्याने आसपासच्या लोकांनी मदत करत तातडीने दवाखान्यात शिर्डीला नेले. मात्र डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले. काकासाहेब रहाणे यांच्यावर बँक व इतर कर्ज होते. सातत्याने दुष्काळ,पीके साथ देत नसल्याने कर्ज वाढत चालले होते. त्यामुळे त्यांनी नैराश्यातून आत्महत्या केल्याचे समजते.

Web Title: Kopargaon Farmer commits suicide by choking on debt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here