Home कोपरगाव १६ वर्षीय अल्पवयीन मुलीस अज्ञात व्यक्तीने पळवून नेले

१६ वर्षीय अल्पवयीन मुलीस अज्ञात व्यक्तीने पळवून नेले

कोपरगाव | Kopargaon:  तालुक्यातील सुरेगाव ग्रामपंचायत हद्दीत राहत असलेली १६ वर्षाची अल्पवयीन मुलगी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी पळवून नेल्याची घटना घडली आहे. मुलीच्या वडिलांनी कोपरगाव पोलीस ठाण्यात बेपत्ता मुलीची फिर्याद दिली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी कि, फिर्यादी मुलीचे वडील हे व्यवसाय करतात. सुरेगाव परिसरात त्यांचा व्यवसाय आहे. ते आपल्या कुटुंबासमवेत सुरेगाव येथे राहतात. त्यांची १६ वर्षाची मुलगी मंगळवार दिनांक २९ सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास गायब झाली आहे. तिचे नातेवाईक, मैत्रीण, आप्त यांच्याकडे चौकशी केली असता ती मिळून आली नाही. त्यामुळे वडिलांनी २ ऑक्टोबर रोजी आपली मुलगी अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी आपल्या रखवालीतून पळून नेल्याची फिर्याद कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.

याप्रकरणी तालुका पोलिसांनी अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. तालुका पोलीस मुलीचा तपास करीत आहेत.  

महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळावा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.

See:  Latest Entertainment News, Latest Ahmednagar News in Marathi, and  Latest Marathi News

Web Title: Kopargaon minor girl was abducted by an unknown person

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here