अहमदनगर जिल्ह्यातील आणखी एका आमदारांना कोरोनाची लागण
कोपरगाव | Kopargaon MLA Ashutosh kale Corona Positive: श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांना कोरोनाची लागण झाली असून याबाबत त्यांनी स्वत: मंगळवार (दि.25) रोजी ट्विट करून माहिती दिली आहे.
ना. आशुतोष काळे यांची प्रकृती उत्तम आहे. त्यांना करोनाची लक्षणे जाणवत नसून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांच्यावर घरीच उपचार सुरू आहेत. माझ्या तब्बेतीची काळजी करण्याचे कारण नाही. मात्र माझ्या संपर्कात आलेल्या नागरिकांनी आपली करोना चाचणी करून घ्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे.
ना. आशुतोष काळे यांचा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याची बातमी कार्यकर्त्यांना समजताच सोशल मिडीयावर कार्यकर्त्यांनी तब्बेतीची काळजी घ्या, लवकर बरे व्हा अशा आशयाच्या भावनिक पोस्ट टाकून सहानुभूती व्यक्त केली आहे. सोशियल मेडियाच्या माध्यमातून सहानुभूती व्यक्त होत आहे.
दरम्यान या अगोदर जिल्ह्यातील मंत्री, आमदार, खासदार यांना कोरोनाची लागण झाली असून ते या आजारातून बरे झाले आहे.
Web Title: Kopargaon MLA Ashutosh kale Corona Positive