Home अहमदनगर अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ

अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ

Koaprgaon of the Dead body of an unknown Isma

कोपरगाव | Kopargaon:  तालुक्यातील संवत्सर काळा माथा परिसरात वनजमिनीत अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. संवत्सर ग्रामपंचायत हद्दीत सरकारी वन जमिनीत काळा माथा या ठिकाणी एका 40 वर्षीय अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला आहे.

तो सडपातळ असून डोक्याचे केस काळे, दाढी वाढलेली असून त्याच्या अंगावर पांढर्‍या रंगाचा शर्ट, काळ्या रंगाची जीन्स पॅन्ट असल्याची माहिती पोलीसांनी दिली.

याप्रकरणी कोपरगाव येथील परिमंडळ वन अधिकारी भाऊसाहेब संपत गाढे यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात खबर दिली आहे. याबाबत आत्महत्या की घातपात याबाबत उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. याबाबत शहर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: Koprgaon of the Dead body of an unknown Isma

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here