Home अहमदनगर शाळकरी विद्यार्थिनीवर लॉजवर नेऊन वेळोवेळी पाच ते सहा महिने अत्याचार

शाळकरी विद्यार्थिनीवर लॉजवर नेऊन वेळोवेळी पाच ते सहा महिने अत्याचार

Kopargaon sexual abused of a schoolgirl for five to six months

Ahmedmnagar News | कोपरगाव | Kopargaon :  कोपरगाव शहरातील एका नगरात राहणाऱ्या अल्पवयीन शाळकरी मुलीला लग्नाचे आमिष दाखवून शिर्डी, कोपरगाव ठिकाणी लॉजवर नेऊन वेळोवेळी पाच ते सहा महिने अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. अत्याचार करणारा तरुणही तिथेच शहरात राहणारा असून आमिष दाखवत तिच्यावर वेळोवेळी अत्याचार (Sexual abused) केला.

याप्रकरणी आरोपी अनिकेत महादू शिर्के (२७) याला अटक करण्यात आली आहे.

याबाबत १७ वर्षीय पीडित शाळकरी मुलीने कोपरगाव शहर पोलिसात रविवारी रात्री उशिरा फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, गेल्या सहा-सात महिन्यापासून आरोपी युवकाने या शाळकरी मुलीला लग्नाचे आमिष दाखवून शिर्डी, कोपरगाव ठिकाणी लॉजवर नेऊन वेळोवेळी ५  ते ६ महिने अत्याचार केला असल्याचे म्हंटले आहे. तसेच जातीवाचक बोलून याबाबत जर कोणाला सांगितले, तर जिवे मारण्याची धमकी दिली असे पीडित मुलीने फिर्यादी मध्ये म्हटले आहे.

या फिर्यादीवरून कोपरगाव शहर पोलिसांमध्ये आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीस अटक करण्यात आली असून अधिक तपास उपविभागीय पोलिस अधिकारी शिर्डी हे करीत आहे.

Web Title: Kopargaon sexual abused of a schoolgirl for five to six months

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here