Home संगमनेर संगमनेर: कुंटणखाना चालक महिलेसह पाच जणांना पोलिस कोठडी

संगमनेर: कुंटणखाना चालक महिलेसह पाच जणांना पोलिस कोठडी

Breaking News | Sangamner: कुंटणखाना चालविणाऱ्या महिलेसह पाच जणांना १२ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी.

Kuntankhana driver woman and five people in police custody

संगमनेर: तालुक्याच्या पठार भागात पोखरी बाळेश्वर शिवारामध्ये कुंटणखाना चालविणाऱ्या महिलेसह पाच जणांना घारगाव पोलिसांनी संगमनेर न्यायालयासमोर उभे केले. या सर्वांना १२ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोखरी बाळेश्वर शिवारात गेल्यावर्षी याच वेश्या व्यवसायावर श्रीरामपूर उपविभागाचे तत्कालीन पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी छापा टाकून कारवाई केली होती, मात्र पुन्हा महसूलने जागेला परवानगी दिली. यामुळे हा व्यवसाय सुरू झाला.

पोलिस सरकारी वाहनातून कारवाईला जात होते. वाहन सीसीटीव्हीत दिसताच अलार्म वाजत होता. पोलिस आल्याची माहिती महिलेच्या खबऱ्यांना मिळाल्याने सर्व जण शेतामध्ये लपत असत. पोलिस पथकाला हात हलवत परतावे लागत असे.

या वेश्या व्यवसायाचा खऱ्या अथनि भांडाफोड करण्यास पथक येत आहे, याची खबर मिळू नये म्हणून, पोलिस पथकाने गुप्तता पाळली. रात्री मालवाहू पिकअपमध्ये पोलिस बसले. यामुळे वेश्या व्यवसाय करणारे गाफील राहिले. पथकाचा वेश्या व्यवसायावर कारवाईचा गेम ‘फत्ते’ झाला.

Web Title: Kuntankhana driver woman and five people in police custody

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here