Home महाराष्ट्र राज्यात पहिली ते चौथीच्या शाळा  या तारखेपासून होणार सुरु

राज्यात पहिली ते चौथीच्या शाळा  या तारखेपासून होणार सुरु

Latest Marathi News first to fourth schools will start from this date

मुंबई | Latest Marathi News: कोरोना काळात शाळांचे नियोजन कोलमडलेले आहे. शाळा कधी सुरु होणार याबाबत सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होत असल्याने राज्यातील शाळा सुरु करण्याकडे सरकारने सकारात्मक पाउले टाकली आहेत.

आता शाळा सुरु होण्याचा मार्ग मोकळा झा;झाला. महत्वाची माहिती समोर आली आहे. येत्या राष्ट्रीय शिक्षक दिनाचे औचित्य साधून 11 नोव्हेंबरपासून राज्यातील पहिली ते चौथीच्या प्राथमिक शाळा सुरू होणार आहेत. याबाबत प्राथमिक शाळांच्या स्वच्छता करणेबाबत वरिष्ठ स्तरावर सुचना देण्यात आल्या आहेत.

राज्यातील मुंबई, पुणे, सोलापूर, सातारा, नगर जिल्हा अजूनही कोरोनाच्या प्रादुर्भावाखाली आहेत. मात्र अन्य जिल्ह्यातील कोरोनाची लाट आता बऱ्यापैकी ओसरली आहे. अशा परिस्थितीत मुलांचे नुकसान होऊ नये याकरिता राज्य शासनाने माध्यमिक शाळा सुरू करण्याचा निर्णय अगोदर घेतला.

Web Title: Latest Marathi News first to fourth schools will start from this date

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here